ETV Bharat / state

Fertilizers : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मिळणार मुबलक खत; कृषी विभागाने केली नियोजन - fertilizers during Rabi season

शेतकऱ्यांना बियाणे, ( Farmers will get seeds on time ) रासायनिक खतांचा तुटवडा ( Shortage of chemical fertilizers ) निर्माण होवू नये म्हणुन कृषी विभागाकडून नियोजन ( Agriculture department started planning chemical fertilizers ) करण्यात येत आहे.

Fertilizers
Fertilizers
author img

By

Published : Nov 30, 2022, 7:14 PM IST

अकोला - दरवर्षी पेरणीचा काळ येण्याआधी बाजारांमध्ये बियाणे, ( Farmers will get seeds on time ) रासायनिक खतांचा तुटवडा ( Shortage of chemical fertilizers ) निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. जिल्ह्यात खरीप, रब्बी पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना बियाणे, खते मिळवण्यासाठी धावपळ होऊ नये, याकरिता कृषी विभागाकडून नियोजन ( Agriculture department started planning chemical fertilizers ) करण्यात येत आहे.

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मिळणार मुबलक खत

तुटवडा होणार नसल्याचा दावा - खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे या रब्बी हंगामामध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे .पेरणीच्या आधीपासूनच बाजारांमध्ये शेतीनिष्ठांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा अफवा बऱ्याच वेळा पसरविण्यात येतात. यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे चांगलेच पावते. परिणामी, तुटवडा नसतानाही ते कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक वेळा खते, बियाणे यांच्या भाव वाढीचा प्रयत्न फसलेला आहे. परिणामी, कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

fertilizers during Rabi season
रासायनिक खतांचा तुटवडा नाही

शेतकऱ्यांना मात्र तुटवडा : रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाचे जिल्ह्यात सर्वात जास्त पेरणी करण्यात येते. लाख हेक्टरवर ही पेरणी होत आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्या नियोजनानुसारच कृषी विभाग खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवीत असतो. परिणामी, जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खतांचा तुटवडा नसल्याचा दावा कृषी विभागाचे मोहीम अधिकारी एम. डी. जवंजाळ यांनी केला आहे.

खताचा साठा उपलब्ध : जिल्ह्यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, अमोनियम सल्फेट, संयुक्त खते, मिश्र खते यांचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेला आहे. या खतांपैकी युरिया, डीएपी या दोन खतांचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे या दोन्ही खतांची आवक तथा मागणी कृषी विभागाकडून आवश्यकतेपेक्षा जास्त करण्यात आली होती. प्रशासनाकडूनही मागणी लक्षात घेता पुरवठा कृषी विभागाला करण्यात आलेला आहे.

7 हजार 200 मॅट्रिक टन साठा : जिल्ह्यामध्ये 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत कृषी विभागाला दहा हजार 410 मॅट्रिक टन एवढा साठा युरियाचा, डीएपी 6 हजार 422 मॅट्रिक टन एवढा खताचा उपलब्ध करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, 3 हजार 210 युरिया खताचा साठा हा विक्री केलेला आहे. तर 7 हजार 200 मॅट्रिक टन युरिया खताचा साठा कृषी विभागाकडे शिल्लक आहे. यासोबतच डीएपी खताचा 3,035 मीटर साठा विक्री केलेला आहे. तर 3,387 मीटर डीएपी खताचा साठा अद्यापही कृषी विभागाकडे शिल्लक आहे.

हरभरा बियाणाला मागणी : अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून गहू, हरभरा पेरणीला रब्बी हंगामात जास्त मागणी असते. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांकडून हरभरा मोठ्या प्रमाणात पेरण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी स्वतः जवळील हरभऱ्याची बियाणे पेरल्यामुळे बाजारात कृषी विभागाकडून मागविण्यात आलेला हरभरा हा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने तो अतिरिक्त ठरत आहे. त्यामुळे बाजारातील हरभरा बियाण्याला शेतकऱ्यांकडून मागणी कमी असल्याचे चित्र आहे.अकोला जिल्ह्यामध्ये मागणीपेक्षाही खतांचा साठा मुबलक आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खत बाजारातून खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी मोहीम अधिकारी एम. डी. जवंजाळ यांनी केले आहे.

कृषी विभागाकडून आवाहन - जिल्ह्यामध्ये कोणत्याच खताचा साठा अपुरा नाही. काही ठिकाणी खतांचा साठ्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत असेल तर त्या संदर्भामध्ये कृषी विभागाला माहिती द्यावी, कृषी विभाग त्या ठिकाणी कारवाई करेल, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे मोहीम अधिकारी एम. डी. जवंजाळ यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.