ETV Bharat / state

मुलीच्या प्रेमप्रकरणातून पित्याने केला प्रियकराचा खून, मारेकरी पित्याचाही मृत्यू - murder case in akola

मुलीच्या प्रेमप्रकरणातून पित्याने तरुणाची चाकू भोसकून खून केल्याची घटना आज मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर गावात घडली आहे. या घटनेत मारेकरी पिताही जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

मारेकरी पित्याचा ही मृत्यू
मारेकरी पित्याचा ही मृत्यू
author img

By

Published : Jun 30, 2021, 8:16 PM IST

अकोला - मुलीच्या प्रेमप्रकरणातून पित्याने तरुणाची चाकू भोसकून खून केल्याची घटना आज मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर गावात घडली आहे. या घटनेत मारेकरी पिताही जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे व दिपकराज डोंगरे या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मूर्तिजापूर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, यामध्ये एक जण जखमी झाला आहे.

पित्याने चाकू भोसकून केला खून

धम्मपाल उर्फ आदेश आटोटे (35) हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित असून ते औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. भाच्याच्या लग्नासाठी ते २९ जून रोजी गावी आले होते. मूर्तिजापूर शहरातील प्रतीक नगरात राहणारे आरोपी दिपकराज डोंगरे(55) हे धम्मपाल याच्या मागावर होते. दिपकराज डोंगरे यांनी धम्मपाल यास 30 जून रोजी घरीच समशेरपूर येथे गाठून त्याच्या पोटात चाकूने व कोयत्याने वार केले. त्यात धम्मपाल याचा जागेवरच मृत्यू झाला.

मध्यस्थीसाठी आलेला मृतकाचा भाऊही जखमी

मृतकाचा मोठा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने ते जखमी झाला. तर मारेकरी दिपकराज डोंगरे हे गंभीररीत्या जखमी झाले. उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतक, मारेकरी दोघांचाही होता दांडगा संपर्क..

दिपकराज डोंगरे हे केंद्र प्रमुख असून ॲक्शन फोर्स शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष आहे. त्यांचा शिक्षकामध्येच नव्हे तर इतरही क्षेत्रात दांडगा संपर्क होता. ते सर्वांच्या परिचित होते. तर धम्मपाल आटोटे हेही सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे गावात तसेच औरंगाबाद येथे चांगले कार्य होते. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा - #Cylinder man : गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.