ETV Bharat / state

अकोल्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून विकतायेत कांदा

कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर स्वतंत्रपणे कांदा विकत आहेत.

रस्त्यावर कांदा विकताना शेतकरी महिला
author img

By

Published : May 30, 2019, 3:37 PM IST

अकोला - कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर स्वतंत्रपणे कांदा विकत आहेत. मात्र, त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. यामुळे कांदा उत्पादकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

रस्त्यावर कांदा विकताना शेतकरी महिला

अकोल्याच्या बाजारात कांद्याला १५ ते २० रुपये किलो भाव आहे. हा कांदा बाजारात शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्याकडे ३ ते ४ रुपये किलोने विकला जातो. व्यापारी हा कांदा किरकोळ व्यावसायिकांना ८ ते १० रुपयात विकतो. हेच किरकोळ व्यापारी कांद्याचे भाव बाजारात १५ ते २० रुपयांपर्यंत नेतात. शेतकरी ते किरकोळ व्यापारी, असा प्रवास पाहिला तर कांद्याला ४ रुपयापासून ते २० रुपयांपर्यंत भाव मिळतो. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी हा कांदा रस्त्यावर विक्रीस उपलब्ध केला तर ग्राहक त्याला ढुंकूनही पाहत नाहीत. काही ग्राहक भाव करून शेतकऱ्याची थट्टा उडविण्याचा प्रयत्न करतात. यातील अनेक ग्राहक हे फक्त टाईमपास म्हणून शेतकऱ्याकडे जाऊन कांद्याचे भाव आणि त्याची प्रजाती विचारतात. त्यामुळे आशेने ग्राहकांची वाट पाहत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ग्राहकांकडून बऱ्याच वेळा थट्टा होते. कांदा खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांची टिंगल उडविण्याचा हा प्रकार शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकाचौकांमध्ये दिसून येतो आहे.

शासनाने कृषी विभागाच्या आत्मा विभागातर्फे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन बऱ्याचवेळा दिले जाते. प्रत्यक्षात मात्र, याबाबत काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्यासाठी आत्माने प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Intro:अकोला - बाजारात 15 ते 20 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्याला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर स्वतंत्रपणे कांदा विकत असतानाही त्याच्या कांद्याला मात्र भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अडीचशे ते तीनशे रुपयात 50 किलो कांद्याचे पोते हा शेतकरी कांदा घेऊन रस्त्यावर ग्राहकांची वाट पाहताना दिसतो.

Body:अकोल्याच्या बाजारामध्ये कांद्याला 15 ते 20 रुपये किलो दरम्यान भाव आहे. हा कांदा बाजारात शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्याकडे तीन ते चार रुपये किलोने विकला जातो. व्यापारी हा कांदा किरकोळ व्यवसायिकांना आठ ते दहा रुपयात विकतो. हेच किरकोळ व्यापारी कांद्याचे भाव बाजारात पंधरा ते वीस रुपयांपर्यंत नेतात. शेतकरी ते किरकोळ व्यापारी असा प्रवास पाहिला तर कांद्याला चार रुपयापासून ते वीस रुपयांपर्यंत भाव मिळतो. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी हा कांदा रस्त्यावर विक्रीस उपलब्ध केला तर ग्राहक त्याला ढुंकूनही पाहत नाही. तर काही ग्राहक भाव करून शेतकऱ्याची थट्टा उडविण्याचा प्रयत्न करतात. यातील अनेक ग्राहक हे फक्त टाईमपास म्हणून शेतकऱ्याकडे जाऊन कांद्याचे भाव आणि त्याची प्रजाती विचारतात. त्यामुळे आशेने ग्राहकांची वाट पाहत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ग्राहकांकडून बऱ्याच वेळा थट्टा होते. कांदा खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांची टिंगल उडविण्याचा हा प्रकार शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकाचौकांमध्ये दिसून येतो.
तर दुसरीकडे कृषी विभागाच्या आत्मा विभागातर्फे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बऱ्याच वेळा दिल्या जातात. प्रत्यक्षात मात्र अशी कुठलीच कार्य आपणाकडून होत नसल्याचे हे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे गरजवंत शेतकऱ्यांना आणि आवश्यक त्या शेतकऱ्यांना आपला मार्ग बाजारपेठेत उपलब्ध किंवा विक्री करून देण्यासाठी आत्माने प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. तेव्हाच कुठे शेतकरी हा व्यापारी होऊ शकेल या शासनाच्या विचाराला प्रेरणा मिळेल.

Conclusion:सूचना - सोबत पॅकेज स्टोरी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.