अकोला : गोरक्षण रोडवर असलेल्या ग्रामीण वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला लागून, 33 केव्हीचा विज वितरण करण्याचा प्लांट आहे. या प्लांटमधील एका डीपीमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा मोठा आवाज झाला. परिणामी, येजा करणाऱ्या वाहनचालक यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. त्यांनी जागेवर थांबून काय घडले, याचा शोध घेतला. तर एका डीपिमध्ये स्फोट झाला. हा प्रकार पाहून नागरिक पळाले. तर काहींनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. त्यासोबतच काहींनी ही माहिती अग्निशमन दलास दिली.
कोणतीही जीवितहानी नाही: तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. ही आग जास्त पसरली नाही. तसेच या आगीत कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही. परंतु, प्राथमिक माहितीवरून घटनास्थळी कोणीही नसल्याने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप समजु शकले नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दल व कंपनीच्या अधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे.
गवतालाही लागली आग: या घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. जवळ असलेल्या नागरिकांना बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. त्यासोबत अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली. त्यामुळे आग आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, पॉवर स्टेशनमध्ये मोठ्याप्रमाणात गाजर गवत आहे. ऊन जास्त प्रमाणात पडत असल्याने यातील बहुतांश भागातील गवत सुकले आहे. ही आग लागली तेव्हा आग गवतालाही लागली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वत्र पाणी मारल्याने ही आग जास्त पसरू शकली नाही. त्याचबरोबर प्लांटमध्ये लागलेल्या स्फोटाची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. ही माहिती मिळाल्याने त्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती घेतली. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही.
स्फोटात तीन महिला कामगारांचा मृत्यू: याआधीही सोलापूर येथील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील शिराळे गावात एका फटका फॅक्टरीत मोठी दुर्घटना घडली होती. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला होता. फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते. स्थानिक ग्रामस्थांनी, अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली होती. तर फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. स्फोटा दरम्यान तीन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तिन्ही महिलांचे शव पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तसेच तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना एक जानेवारी रोजी घडली होती.