ETV Bharat / state

अकोल्यात पाच हजारांची लाच मागणारा अभियंता एसीबीच्या जाळ्यात - अभियंता एसीबीच्या जाळ्यात बातमी

पातूर शहरातील तक्रारदार महिलेने नवीन विद्युत जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला होता. अनेक वेळा हेलपाटे मारुन ही महिलेला नवीन विद्युत कनेक्शन मिळाले नाही. त्यासाठी महिलेने सहायक अभियंता विनोद लांजेकर यांची भेट घेतली. त्यावेळी विनोद लांजेकर यांनी तिच्याकडे कोटेशन भरण्याच्या नावाखाली पाच हजार रुपयाची मागणी केली.

अभियंता
author img

By

Published : Sep 17, 2019, 11:01 PM IST

अकोला - नवीन विद्युत जोडणीसाठी महिलेला कोटेशनच्या नावाखाली पाच हजाराची लाच मागीतल्याचा प्रकार घडला आहे. लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पातूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अकोल्यात पाच हजाराची लाच मागणारा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा-अकोला: किशोर खत्री हत्याकांडातील प्रमुख आरोपीचा अमरावती कारागृहात मृत्यू

पातूर शहरातील तक्रारदार महिलेने नवीन विद्युत जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला होता. अनेक वेळा हेलपाटे मारुन ही महिलेला नवीन विद्युत कनेक्शन मिळाले नाही. त्यासाठी महिलेने सहायक अभियंता विनोद लांजेकर यांची भेट घेतली. त्यावेळी विनोद लांजेकर यांनी तिच्याकडे कोटेशन भरण्याच्या नावाखाली पाच हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार महिलेला लाच द्यायची नसल्याने तिने विनोद लांजेकरची लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लांजेकर हा तक्रारदार महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने महिलेला तुमचे घर मातीचे असून पूर्ण कागदपत्रे नसल्याने कनेक्शन मिळणार नसल्याचे सांगितले. त्यासाठी पाच हजार रुपये खर्च असल्याचे सांगितले. दरम्यान, सहायक अभियंता लांजेकर याला संशय आल्याने त्याने तक्रारदार महिलेला नियमानुसार 1 हजार 142 रुपयांत कनेक्शन लावून दिले. त्यामुळे एसीबीने त्याच्यावर मागणी केल्याच्या कारणावरुन कारवाई करीत त्याला अटक केली. त्याच्याविरोधात पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:अकोला - नवीन विद्यूत कनेक्शनसाठी महिलेला कोटेशनच्या नावाखाली पाच हजाराची लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंता विनोद लांजेकर याच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज तक्रारदाराच्या घरी अटक केली. तसेच पातूर पोलीस स्टेशला गुन्हा दाखल केला आहे.
Body:पातूर शहरातील तक्रारदार महिलेने नवीन विद्युत कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला. अनेक वेळा हेलपाटे मारून ही तिला नवीन विद्युत कनेक्शन मिळाले नाही. त्यासाठी तिने सहायक अभियंता विनोद लांजेकर याची भेट घेतली. त्यावेळी विनोद लांजेकर याने तिच्याकडे कोटेशन भरण्याच्या नावाखाली पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेला लाच द्यायची नसल्याने तिने विनोद लांजेकरची लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लांजेकर हा तक्रारदार महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने घर मातीचे असून पूर्ण कागदपत्रे नसल्याने कनेक्शन मिळणार नसल्याचे सांगितले. त्यासाठी पाच हजार रुपये खर्च असल्याचे लांजेकर याने सांगितले.
सहायक अभियंता लांजेकर याला संशय आल्याने त्याने तक्रारदार महिलेला नियमानुसार 1 हजार 142 रुपयांत कनेक्शन लावून दिले. त्यामुळे एसीबीने त्याच्या वर मागणी केल्याच्या कारणावरून कारवाई करीत त्याला अटक केली. त्याच्याविरोधात पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूचना - सोबत आरोपीचा फोटो पाठवीला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.