अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाईच आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मराठा सेवा संघाच्यावतीने आज निदर्शने केली गेली. याचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार नारेबाजी करण्यात आली.
हेही वाचा- शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?
शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध सर्वत्र व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केली असून त्याचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने निवडणुकीच्या काळात केलेली ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात निवेदन दिले.