अकोला - महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयमध्ये आज (रविवार) घेण्यात आला. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी उभारलेल्या या संस्थेचा नावलौकिक निर्माण करणे हे आपलं काम आहे. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या बिंदूला रेषा करण्याचे कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे, असे अमृत महोत्सवाच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम सोहळा रविवारी श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातामध्ये संपन्न झाला. या सत्कार समारंभाला उत्तर देताना विठ्ठल वाघ यांनी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ज्या शिक्षकांनी तुकाराम गाडगेबाबा नामदेव पंजाबराव देशमुख यांचे जीवनपट वाचले नाही, ते विद्यार्थ्यांना घडवू शकत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या 'तिफन' आणि 'बाप' या दोन्ही सुप्रसिद्ध कविता म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
हेही वाचा - ...म्हणून जन्मदात्यानेच केला अविवाहित मुलाचा खून
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, सिनेदिग्दर्शक राजदत्त व ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिडकर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे, प्रा. रावसाहेब काळे यांच्यासह उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, श्रीपाद अपराजित, राजदत्त, हर्षवर्धन देशमुख यांनी कवी विठ्ठल वाघ यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले.
हेही वाचा - वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या बोलेरोची ट्रॅक्टरला धडक, २ जण ठार