ETV Bharat / state

भाजप-सेना युतीच्या वादाचा 'वंचित'ला फायदा - प्रकाश आंबेडकर

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फारसे सख्य आहे, असे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वादाचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल. राष्ट्रवादीकडे मराठा समाजाची मत वळणार असल्याने भाजपचे मतदान कमी होईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 21, 2019, 12:35 PM IST

अकोला - भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फारसे सख्य आहे, असे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वादाचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

भाजप आणि शिवसेना वादाचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल

सध्याची परिस्थिती आमच्यासाठी आशादायक आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये भाजपही सभा घेऊ शकली नाही. मतदारांचा कल वंचित आघाडीकडे वाढला असून त्याचा फायदा आम्हाला नक्की होणार. ही लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप-सेना यांच्यामध्ये आहे. राज्यात काँग्रेस कुठेच दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला लोक कल देताना दिसत आहेत. त्यामध्येही आम्ही आघाडीवर आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादीकडे वाढलेला लोकांचा कल दाखवत आहे की भाजपचा प्रभाव कमी झाला. राष्ट्रवादीकडे मराठा समाजाची मत वळणार असल्याने भाजपचे मतदान कमी होईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.

Intro:अकोला - भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांमध्ये फारसे सख्य आहे असे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वादाचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल, असा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

Body:सध्याची परिस्थिती आमच्यासाठी आशादायक आहे ज्याप्रमाणे लोकांनी आम्हाला विश्वास दिला त्यावरून ते दिसते आहे मुंबईसारख्या शहरांमध्ये भाजपही सभा घेऊ शकली नाही भाजप-सेना युती यांच्याकडे मतदारांचा आधीपेक्षा कमी कल आहे हा मतदारांचा कल वंचित कडे वाढला असून त्याचा फायदा आम्हाला नक्की होणार आहे दुसरीकडे असे आहे की वरळी येथील का कार्यालयात चार कोटी रुपये सापडले आहे या संदर्भात चौकशी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला
ही लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप-सेना यांच्यामध्ये चाहे काँग्रेस कुठेच दिसत नसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा लोक फॉलो करत आहेत तरीही त्यामध्ये आम्ही आघाडीवर आहेत असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले राष्ट्रवादीकडे वाढलेला लोकांचा कल म्हणजे भाजप डॅमेज झाल्याचं दिसत आहे तसेच राष्ट्रवादीकडे मराठा समाजाची मत वळणार असल्याने भाजपची मतदान कमी होउन असेही ते म्हणाले त्यामुळे भाजपचा जो होता होता तो कमी झाला आहे असा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.