ETV Bharat / state

अकोल्यात सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही..

author img

By

Published : Jun 15, 2020, 2:54 AM IST

पंचशील नगरातील आदर्श बुध्दविहारच्या बाजुला राहणारे प्रल्हाद हिवराळे यांच्या घरी सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Cylinder blasted in Akola city no casualty reported
अकोल्यात सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही..

अकोला - कृषी नगरातील पंचशील नगर येथे आदर्श बुद्धविहार बाजूला असलेल्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाने वेळीच घरात भरलेले दुसरे सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

पंचशील नगरातील आदर्श बुध्दविहारच्या बाजुला राहणारे प्रल्हाद हिवराळे यांच्या घरी सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अग्नीशमन दलाच्या एका जवानाने घरात असलेले दुसरे भरलेले सिलिंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी दाखल झालेल्या जवानांनी आग आटोक्यात आणली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसही दाखल झाले होते.

हेही वाचा : परातवाड्यात मुसळधार पावसामुळे अकोला महामार्गावरील वाहतूक ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.