ETV Bharat / state

झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 'भारतबंद' - नाना पटोले - शेतकऱ्यांचे भारत बंद आंदोलन

देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न व कमकुवत अव्यवस्थेबाबत केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर भारत बंद आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : Sep 26, 2021, 3:18 PM IST

Updated : Sep 27, 2021, 7:40 AM IST

अकोला - देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न व कमकुवत अर्थव्यवस्थेबाबत केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये देशात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला आम्ही समर्थन करीत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी दिली आहे. स्वराज्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले
भारत बंद आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा -

देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यावसायिकांनाही केंद्र सरकार दिलासा देत नाही. महागाईचा मोठा फटका केंद्र सरकार देशवासीयांना देत आहे. केंद्र सरकारची ही भूमिका संशयास्पद आहे. परिणामी, केंद्र सरकारविरोधात देशात विरोधाची लाट निर्माण झाली आहे. देशामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. त्यासाठी देशभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. भारत बंद आंदोलनात सर्व व्यापारी सहभागी होणार आहेत. तसेच इतर संघटना व इतर राजकीय पक्षांनीही या बंदला समर्थन दिले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

हे ही वाचा - संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाची नासाडी, शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच

कोरोना नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित -

पुढे ते म्हणाले, कोरोना हा नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे. देशांमध्ये कोरोना पसरविण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणापासून 25 किलोमीटरपर्यंत केंद्र सरकारने मोठ्या भिंती बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. जेणेकरून या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला कोणीही जाऊ शकणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Sep 27, 2021, 7:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.