अकोला - गारपीटमुळे केळी पिकांच्या नुकसान भरपाईचा विमा न भेटल्याने अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दुपारी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतीली. या आधीही याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी याच कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडले होते.
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर, बोचरा, दिवठाणा, पनज, रुईखेड येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. पीक विमा काढल्यानंतर ही त्यांना गेल्या पाच महिन्यापासून नुकसान भरपाई मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात विमा भरपाई मागण्यासाठी धाव घेतली. मात्र, शेतकऱ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दर्शविण्यात येत आहे. तुम्ही नंतर या, अशी भाषा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मात्र, केव्हा यायचे हे तरी सांगा, आणि पैसे देण्यास वेळ का लागत आहे, हे लेखी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी लेखी देण्यास नकार दिला, त्यामुळे शेतकरी चिडले आहेत.
विमा देताना तफावत आढळून येत आहे. कोणाला जास्त तर कोणाला कमी रक्कम देण्यात येत असून काही शेतकऱ्यांना तर रक्कम मिळालीच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, कपनिचे अधिकारी याबाबत काहीच ऐकण्यास तयार नाहीत. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही अहमदनगर येथील कार्यालयात जा, असा उरफाटा सल्ला ही कपणीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे जोपर्यंत पैसे मीळत नाहीत, तोपर्यंत कार्यालय सोडणार नसून वेळ पडल्यास आत्मदहन करणार असल्याचा निर्धार रवींद्र वालशीणगे, मनोज बोचे, रोशन दमदार, अमोल बोरुडे या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.