ETV Bharat / state

परतीच्या पावसाने भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Nov 2, 2019, 7:38 PM IST

शहराला पाणी पुरवठा करणारा काटेपूर्णा प्रकल्प परतीच्या पावसाने तुडुंब भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे एक तासांसाठी दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. प्रकल्पातील पाण्यामुळे अकोलेकरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. मात्र, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काटेपूर्णा प्रकल्प

अकोला- शहराला पाणी पुरवठा करणारा काटेपूर्णा प्रकल्प परतीच्या पावसाने तुडुंब भरला आहे. दिवाळीपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे अवघ्या दहा दिवसात हा प्रकल्प ३० टक्के इतका भरला आहे. त्यापूर्वी हा प्रकल्प ७० टक्के भरलेला होता. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चारही दरवाजे एक तासांसाठी दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. प्रकल्पातील पाण्यामुळे अकोलेकरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. मात्र, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी व पाटबंधारे विभागातील सहायक अभियंता अभिजित नितनवरे

काटेपूर्णा प्रकल्पाची क्षमता ८६.३५ दलघमी आहे. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पातून अकोला शहर आणि ८,३२५ हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. या प्रकल्पाचे चार दरवाजे एक तासापर्यंत दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. १०० टक्के भरलेल्या या प्रकल्पातून विसर्ग होत असल्यामुळे त्यातून वर्षभर अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे व सिंचनाचा प्रश्न देखील मिटणार आहे. विसर्गामुळे अंदाजे सव्वाआठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र, नदीकाठच्या १८ गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२०१६ मध्ये काटेपूर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यानंतर हा प्रकल्प २०१६ च्या तुलनेत कमी प्रमाणात भरत होता. २०१८ मध्ये हा प्रकल्प ९४.६० टक्के भरला होता. त्यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यातील पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर उन्हाळ्यात या प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा होता. पावसाळा सुरू होण्याआधी या प्रकल्पात ३ टक्के पाणीसाठा उरला होता.

हेही वाचा- अकोल्यात ऑटो आणि दुचाकीचा अपघात; सहा जण जखमी

दिवाळीआधी या प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा होता. दिवाळी पासून पडलेला परतीचा पाऊस हा या प्रकल्पाला जीवदान देणारा ठरला. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पाऊस पडला की हा प्रकल्प भरतो. दिवाळी नंतर परतीच्या पावसाने एक दिवस लावलेल्या हजेरीने मालेगावात ७९ मिमी पाऊस पडला. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरला. प्रकल्पाचे चार दरवाजे एक तासांसाठी दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

हेही वाचा- विमा कंपनीकडून मुदतवाढ मिळण्यासाठी आमदाराचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; मुख्यमंत्र्यांनाही केला फोन

Intro:अकोला - अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्प परतीच्या पावसात भरला. दिवळीपासून पडलेल्या परतीच्या पावसाने अवघ्या दहा दिवसांत 30 टक्के प्रकल्प भरले. त्यापूर्वी हा प्रकल्प 70 टक्के भरलेले होते. या प्रकल्पाची क्षमता 86.35 दलघमी आहे. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पातुन अकोला शहर आणि 8, 325 हेक्टर जमिनीसाठी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. या प्रकल्पाचे चार दरवाजे एक तास दहा सेंटीमीटर उघडून 25 क्यूमेक पान्याचा विसर्ग करण्यात आले. 100% भरलेल्या या प्रकल्पातून विसर्ग होत असल्यामुळे हा प्रकल्प आता वर्षभर अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा होणार असून सिंचनाचा प्रश्न ही या प्रकल्पामुळे मिटला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अंदाजे सव्वाआठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. नदीकाठच्या18 गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Body:अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात यावर्षी शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. हा प्रकल्प 2016 मध्ये शंभर टक्के भरला होता. त्यानंतर हा प्रकल्प त्यापेक्षा कमी प्रमाणात भरत होता. 2018 मध्ये हा प्रकल्प 94.60 टक्के भरला होता. त्यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यातील पाणी हे सिंचनासाठी सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर या प्रकल्पात उन्हाळ्यात 15 टक्के पाणी साठा होता. पावसाळा सुरू होण्यावेळी या प्रकल्पात तीन टक्के पाणी साठा होता.
दिवाळीच्या आधी या प्रकल्पात 70 टक्के पाणी साठा होता. दिवाळी पासून पडलेला परतीचा पाऊस हा या प्रकल्पाला जीवदान देणारा ठरला. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पाऊस पडला की हा प्रकल्प भरतो. दिवाळी नंतर परतीच्या पावसाने एक दिवसात लावलेल्या हजेरीने मालेगावात 79 मिमी पाऊस पडला. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरला. प्रकल्पाचे चार दरवाजे एक तासांसाठी दहा सेंटीमीटर उघडून 25 क्यूमेक पान्याचा विसर्ग करण्यात आला.

बाईट - अभिजित नितनवरे
सहायक अभियंता श्रेणी 1
पाटबंधारे विभाग, अकोला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.