अकोला - पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पथकाने त्यांच्याकडून 2 लाख 31 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा... धावत्या रिक्षात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाच्या तावडीतून सुटकेसाठी पीडितेची उडी
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांचे विशेष पथक एमआयडीसीमध्ये गस्त घालत होते. त्यांना, कुंभारी रोडजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. यानंतर सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेव्हा घटनास्थळी शेख फिरोज शेख मक्सुद, इंद्रजीत रामशिपाही दहायत, अफजल खान लियाकत खान, श्रीकृष्ण नंदु वानखडे, मोहम्मद निसार मो.शफी, गणेश शाहादेव आघडे, शिलधन रामेश्वर डोंगरे, गजानन पांडुरंग चांदुरकर, शंकर अंबर डिडीये, गौतम सदाशिव भंडारे, शेख गफुर शेख रसुद, प्रविण उर्फे श्रावण ज्ञानदेव डांबलकर यांना ताब्यात घेण्यात आले. या सगळ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 31 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांड: 'हैदराबाद एनकाऊंटर पॅटर्न महाराष्ट्रात अमलात आणा'