ETV Bharat / state

अकोल्यातून संजय धोत्रेंचा विजयी चौकार, प्रकाश आंबेडकरांचा पराभव

अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रेंचा विजय झाला आहे.

अकोला लोकसभा LIVE: तिहेरी लढतीत 'वंचितला मिळणार का बहुमताची आघाडी?, थोड्याच वेळात होणार स्पष्ट
author img

By

Published : May 23, 2019, 6:00 AM IST

Updated : May 23, 2019, 7:53 PM IST

Live Update-

  • 05.21 PM- संजय धोत्रेंचा विजय
  • 02.29 PM - संजय धोत्रे - 2,68,399 प्रकाश आंबेडकर- 1,35,117 हिदायत पटेल- 1,45,091 मते
  • 02.29 PM - संजय धोत्रे - 2,04,002, प्रकाश आंबेडकर- 1,16,859 हिदायत पटेल- 1,05,176 मते
  • 12.53 PM - संजय धोत्रे - 1,62,762, प्रकाश आंबेडकर- 93,900 हिदायत पटेल- 82,635 मते
  • 12.09 PM - संजय धोत्रे - 1,40,664, प्रकाश आंबेडकर- 81,724, हिदायत पटेल- 72776 मते
  • 11.47 AM - सहावी फेरी - संजय धोत्रे - 1,22,171, प्रकाश आंबेडकर- 73,666, हिदायत पटेल- 55670 मते
  • 11.47 AM - पाचवी फेरी - संजय धोत्रे - 102285, प्रकाश आंबेडकर- 61412, हिदायत पटेल- 45770 मते
  • 11.32 AM - चौथी फेरी - संजय धोत्रे - 80901, प्रकाश आंबेडकर- 49347, हिदायत पटेल- 35501 मते
  • 11.01 AM - तिसरी फेरी - संजय धोत्रे - 59615, प्रकाश आंबेडकर- 36876, हिदायत पटेल-26650 मते
  • 10.17 AM - दुसरी फेरी - संजय धोत्रे - 39649, प्रकाश आंबेडकर- 15926, हिदायत पटेल-24089 मते
  • 10.02 AM - मतमोजणी ऐकण्यासाठी मतमोजणीकेंद्राबाहेर एकही कार्यकर्ता उपस्थित नाही.
  • 09.25 AM - भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर
  • 09.03 AM - रिसोड मतदार संघातील एका मतपेटीवर नंबर नसल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांकडून मशीनची तपासणी सुरु
  • 08.23 AM - भाजप उमेदवार संजय धोत्रेंनी व्यक्त केला विजयी होण्याचा आत्मविश्वास
  • 08.00 AM - मतमोजणीला सुरुवात

अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रेंचा विजय झाला आहे. यासाठी शासकीय गोडाऊन खांदान, अकोला या ठिकाणी मतमोजणी झाली. या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या मतदारसंघामध्ये २०१४ प्रमाणेच तिरंगी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर, भाजपचे संजय धोत्रे आणि काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात होते. आता या चुरशीच्या लढतीत संजय धोत्रेंचा विजय झाला आहे, तर प्रकाश आंबेडकर आणि हिदायत पटेल यांचा पराजय झाला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. या ठिकाणी खासदार संजय धोत्रे हे यंदा चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसने ऐन वेळी हिदायत पटेल यांना उभे करून पुन्हा मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली होती. हिदायत पटेल हे दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत होते. तर वंचित बहुजन आघाडी तयार करणारे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे नवव्यांदा या अकोल्यातून निवडणूक लढवत होते.

2014 ची पार्श्वभूमी-

2014 च्या लोकसभा मतदारसंघात 58.51 टक्के इतके मतदान झाले होते. तर भाजपचे संजय धोत्रे हे या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या निवडणुकीत हिदायत पटेल आणि प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला होता. त्या निवडणूकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.