अकोला - उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अकोला येथील शिवसैनिकांनी सेनेच्या कार्यालयावर जल्लोष करीत आनंद साजरा केला, तसेच पेढेही वाटले. यावेळी शिवसैनिकांनी टरबूज फोडून जल्लोष करीत नारेबाजी केली.
हेही वाचा- केवळ फडणवीसच नाहीत, तर 'हे' आहेत देशभरातील 'औटघटके'चे ठरलेले मुख्यमंत्री
रातोरात भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे याबाबत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 24 तासात बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिल्यानंतर सरकार स्थापन होऊ शकत नसल्याने अजित पवार व नंतर फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या घडामोडींनंतर अकोल्यातील शिवसैनिकांनी जल्लोष केला. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी पूर्व शहर प्रमुख अतुल पवणीकर, शहर उपप्रमुख योगेश अग्रवाल, गजानन बोराडे, अविनाश मोरे, केदार खरे, सुरेंद्र विसपुते, विनोद सोनकर, प्रभाकर दलाल, कुणाल शिंदे, कुणाल पिंजरकर उपस्थित होते.