ETV Bharat / state

अकोल्यात 27 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला एसीबीने ठोकल्या बेड्या - अकोला न्यूज अपडेट

जप्त केलेली देशी दारू, रिक्षा सोडविण्यासाठी आणि संचारबंदीच्या काळात दारू विक्रीसाठी अवैधरित्या परवानगी देण्यासाठी 27 हजारांची लाच स्वीकारतांना पोलीस शिपाई गणेश पाटील याला पकडले आहे. ठाण्यातच दबा धरून बसलेल्या अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यास आज रंगेहाथ अटक केली.

पोलीस शिपायाला एसीबीने ठोकल्या बेड्या
पोलीस शिपायाला एसीबीने ठोकल्या बेड्या
author img

By

Published : Jun 10, 2021, 10:07 PM IST

अकोला - जप्त केलेली देशी दारू, रिक्षा सोडविण्यासाठी आणि संचारबंदीच्या काळात दारू विक्रीसाठी अवैधरित्या परवानगी देण्यासाठी 27 हजारांची लाच स्वीकारतांना पोलीस शिपाई गणेश पाटील याला पकडले आहे. ठाण्यातच दबा धरून बसलेल्या अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यास आज रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे रामदास पेठ पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा कर्मचारी पोलीस निरीक्षक यांचा रायटर असल्याची माहिती आहे.

अकोल्यात 27 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला एसीबीने ठोकल्या बेड्या

लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला एसीबीकडून बेड्या

रामदास पेठ पोलिसांनी तक्रारदार यांचा देशीदारुचा माल कारवाई करून जप्त केला होता. तसेच त्याची रिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्यामुळे या वस्तू मिळाव्यात यासाठी तक्रारदार यांनी पोलीस शिपाई गणेश पाटील याच्याशी बोलणी केली. त्याने तक्रारदार यांना पैशाची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्यामध्ये बोलणी झाली. शेवटी 27 हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच जप्त माल परत करणे, यासोबतच संचारबंदीच्या काळात दारू विक्रीची परवानगी देण्यासाठी मागणी करण्यात आली. ठरल्यानुसार तक्रारदार हा पोलीस निरीक्षक यांच्या रायटर यांच्या कक्षात आला. त्याठिकाणी आधीपासूनच पोलिस शिपाई गणेश पाटील हजर होता. तक्रारदार यांनी पाटील यास पैसे दिले आणि लपून बसलेल्या एसीबीच्या पथकाला इशारा केला. एसीबीच्या पथकाने पोलीस शिपाई गणेश पाटील याला रंगेहाथ 27 हजार रुपये घेतल्यावरून अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा - पीक कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार 0 टक्के व्याजाने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.