अकोला - सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे केल्यामुळे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास पूर्णवेळ आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
आशा स्वयंसेविकेला कामावर आधारित दिला जात असलेला मोबदला कमी मिळत आहे. आशा गतप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा, आशा गतप्रवर्तक शासकीय सेवेत कायम होत पर्यंत अंगणवाडी सेविका समान मानधन द्यावे या त्यांच्या मागण्या आहेत. याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री व सबंधीत खात्यांच्या मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेतही त्यांनी आश्वासन दिले. परंतु, आतापर्यंत कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आशा गतप्रवर्तक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी सचिव संध्या डिवरे, संतोष चिपडे, रुपाली धांडे, ज्योती बेलोकार, कालिनदा देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.