अकोला - आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यातील तिघांना घरी आणि 19 जणांना संस्थागत विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी चार पुरुष व पाच महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अकोट फैल, देशमुख फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. 22 जणांना रविवारी रात्री सुटी देण्यात आली. त्यातील तिघांना घरी तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल - 183
पॉझिटीव्ह - नऊ
निगेटीव्ह - 174
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 406
मृत्यू - 24 (23+1)
डिस्चार्ज - 251
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 131