अकोला - जिल्ह्यात आज (दि. 19 जुलै) दिवसभरात 47 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 47 जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, रॅपिड अँटीजन टेस्टचे रुग्णही निघतच आहेत.
सकाळी 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 18 महिला व 29 पुरुष आहेत. त्यातील 33 जण हे अकोट येथील, 11 जण मुर्तिजापूर येथील तर उर्वरित अकोला शहरातील दगडी पूल, जुना तारफाईल व रामनगर या भागातील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, शनिवारी (दि. 18 जुलै) रात्री रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 120 झाली आहे. ही संख्या ही आजच्या अहवालात पॉझिटिव्ह अहवाल व दाखल रुग्ण संख्येत समाविष्ट आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री एका कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत व्यक्ती 60 वर्षीय पुरुष असून मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण 16 जुलैला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांचा शनिवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोव्हिड केअर सेंटरमधून 31, आयकॉन रुग्णालयातून तीन, हॉटेल रिजेन्सीमधून 5, अशा एकूण 47 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल
प्राप्त अहवाल - 282
पॉझिटीव्ह - 47
निगेटीव्ह - 235
आतापर्यंतची स्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल - 2014+120 = 2134
मृत - 102 (101+1)
डिस्चार्ज- 1729
सक्रिय रुग्ण (ॲक्टीव्ह रुग्ण) - 303