अकोला - शहरात कोरोना रुग्णांची संख्या आज 20ने वाढल्यामुळे नागरिकांती चिंता वाढली आहे. आज तपासण्यात आलेल्या 124 अहवालानुसार 20 अहवाल हे पॉझिटिव्ह निघाले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी 8 महिला व 12 पुरुष आहेत. त्यातील तीन गीतानगर, दोन ताजनापेठ, दोन आश्रय नगर डाबकीरोड, तर रणपिसेनगर, गुलजारपुरा, न्यू खेताननगर कौलखेड रोड, आलसी प्लॉट, कच्ची खोली, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, महात्मा गांधी मिल रोड सेंट्रल वेअर हाऊसिंग जवळ, भीम चौक अकोट फैल, तेलीपुरा चौक इमानदार प्लॉट, अकोट फैल, माळीपुरा, पंचशिलनगर वाशिम बायपास रोड, नानकनगर निमवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे नागरिक आहेत.
कोरोना संशयित 124 जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी 104 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या अकोल्यात 299 झाली आहे. त्यामधील 112 रुग्ण हे अक्टिव्ह आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त अहवाल
संशयित - 124
पॉझिटीव्ह - 20
निगेटीव्ह - 104