ETV Bharat / state

हृदय विकार असलेल्या १८ बालकांवर मुंबईत होणार उपचार; राष्ट्रीय बाल स्वास्थ्यचा उपक्रम - heart disease akola

लहान बालकांच्या हृदयात छिद्र असणे व त्यावर उपचार करण्यासाठी पालकांकडे पैसा नसल्यामुळे अनेक बालकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. अशा बालकांवर पैशाअभावी असा प्रसंग ओढवू नये म्हणून आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अशा बालकांचा आरोग्य तपासणी करून त्यांची माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अशा बालकांना उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात येते.

akola
हृदय आजारग्रस्त बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखविताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
author img

By

Published : Jan 15, 2020, 11:49 AM IST

अकोला - जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शालेय तथा नवजात बालकांच्या हृदयासंदर्भातील असलेल्या आजारांची तपासणी करण्यासाठी आज जिल्ह्यातील १८ मुलांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.

हृदय आजारग्रस्त बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखविताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

जिल्ह्यातून आतापर्यंत ३१ बालकांना पाठविण्यात आले असून उर्वरित १५ बालकांना २१ जानेवारीला उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. त्यानंतर अकोला जिल्हा हा बालकांच्या हृदयातील आजारातून मुक्त होणारा जिल्हा ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. लहान बालकांच्या हृदयात छिद्र असणे व त्यावर उपचार करण्यासाठी पालकांकडे पैसा नसल्यामुळे अनेक बालकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. अशा बालकांवर पैशाअभावी असा प्रसंग ओढवू नये म्हणून आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अशा बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांची माहिती गोळा केली जाते. त्यानंतर बालकांना उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात येते. त्या बालकांसह त्यांच्या आई-वडिलांचीही मोफत सर्व व्यवस्था आरोग्य विभागातर्फे करण्यात येते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत हृदय आजारग्रस्त बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, अंकुश गंगाखेडकर, समन्वयक नंदकिशोर कांबळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा- जुगार अड्ड्यावर छापा : 19 जणांवर गुन्हा दाखल, 69 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Intro:अकोला - जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शालेय तथा नवजात बालकांच्या रुदया संदर्भातील असलेले आजारांची तपासणी करून या पालकांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील 18 मुलांना मुंबई येथे आज पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31 बालकांना पाठविण्यात आले असून उर्वरित 15 बालकांना 21 जानेवारी रोजी उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. त्यानंतर अकोला जिल्हा बालकांच्या हृदयातील आजारातून मुक्त होणारा जिल्हा ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.Body:लहान बालकांच्या हृदयात छिद्र असणे व त्यावर उपचार करण्यासाठी पालकांकडे पैसा नसल्यामुळे अनेक बालकांचं उपचाराअभावी मृत्यू होतो. अशा बालकांवर पैशानंभावी असा प्रसंग ओढवू नये व्हावे, म्हणून आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अशा बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांची माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अशा बालकांना उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात येते. त्या बालकांसह त्यांच्या आई व वडिलांची ही मोफत सर्व व्यवस्था आरोग्य विभागातर्फे करण्यात येते.
निवड झालेल्या जिल्ह्यातील 31 बालकांपैकी 18 बालकांना खासगी बसने मुंबई येथे पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत या बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, अंकुश गंगाखेडकर, समन्वयक नन्दकिशोर कांबळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

बाईट - जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी, अकोला

बाईट - निलेश बुधे
पालक, दहीहंडाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.