अकोला - ग्राम लोहारा आणि ग्राम अंदुरा येथे सुरू असलेल्या वरली मटक्याच्या जुगारावर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने गुरुवारी छापा टाकला. या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत १४ आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम लोहारा तसेच ग्राम अंदुरा या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात ग्राम लोहारा येथून बळीराम हरीभाऊ वावरे, आमिन ईसामीया देशमुख, रामबहादूर बलदेवसिंग ठाकूर, खालीक ईस्माईल देशमुख, भास्कर सदाशिवराव दाभाडे, राजाराम भाऊराव धनी, सुखदेव नारायण मोरे, मिलींद महादेवसिंग ठाकूर, रोहण महादेवसिंह सिंघेल यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून रोख १२ हजार ३५० रुपयांसह एकूण ३६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा - पिवंदळच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे; पक्क्या रस्त्याची केली मागणी
तसेच, ग्राम अंदुरा येथील जुगार अड्ड्यावर राहुल विठ्ठल उमाळे, पंजाबराव नामदेव अहीर, श्रावण भोलाजी सोनोने, प्रल्हाद गणपत वानखडे यांना ताब्यात घेतले गेले. त्यांच्याकडून २८ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत ग्राम अंदुरा येथील व्यवसाय मालक गजानन सरोदे रा. रौदंडा यांचे विरूध्द पोलीस ठाणे उरळ येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - अकोल्यात 3 मजली इमारत कोसळली