अकोला - येथून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी एकूण 14 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली. तर एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. तर 10 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी आलेल्या अहवालात ही माहिती समोर आली.
शनिवारी दुपारनंतर कोविड केअर सेंटर येथून 12 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, आयकॉन हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या 67 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला बाळापूर येथील रहिवासी आहे. तिला 3 जुलैला याठिकाणी दाखल करण्यात आले होते.
अकोला कोरोना अपडेट -
- प्राप्त अहवाल - 355
- पॉझिटीव्ह - 10
- निगेटीव्ह - 345
- आता सद्यस्थिती - एकूण पॉझिटीव्ह अहवाल - 1838+21= 1859
- मयत - 92 (91+1)
- डिस्चार्ज - 1464
- दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह) - 303