अकोला - जिल्ह्यात आज पुन्हा ११ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. यामध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. एकूण 74 जणांचे वैद्यकीय नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी 63 जण निगेटिव्ह सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या ११ रूग्णांमुळे अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९७ झाली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये खैर मोहम्मद प्लॉट, माळीपूरा, फिरदोस कॉलनी, आंबेडकर नगर, शासकीय गोदाम खदान, गोकुळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस वसाहत येथील रहिवाश्यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण १९७ कोरोनाबाधित रूग्ण सापडले असून यातील १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १२२ अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.