ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये महिन्याभरापूर्वी बस स्थानकासमोर मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू - मृत्यू

पुणे बस स्थानकासमोर 29 एप्रिलला किरकोळ वादातून एका युवकावर काही युवकांनी हल्ला केला होता.

पुण्यात मारहाण झालेल्या अहमदनगरच्या युवकाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 4, 2019, 7:34 PM IST

Updated : Jun 4, 2019, 7:54 PM IST

अहमदनगर - पुणे बस स्थानकासमोर 29 एप्रिलला किरकोळ वादातून एका युवकावर काही युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम ऊर्फ किरण जगताप, असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे प्रेमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना तो कोमात गेला होता. त्याला आज सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टेशन रोड परिसरात तणावाचे वातावरण होते. यानंतर प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पुण्यात मारहाण झालेल्या अहमदनगरच्या युवकाचा मृत्यू

कोतवाली पोलिसांनी या मारहाणप्रकरणी त्याच वेळी गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र, घटनेला 1 महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेला महिना होऊनही पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत शंका व्यक्त करत नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली आहे.

प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी तसेच आरोपीना अटक करावी, अन्यथा मुतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Intro:अहमदनगर- मारहाणीत जखमी झालेल्या
युवकाचा मृत्यू , आरोपींना अटक झाली नसल्याने पोलिसांवर नाराजी..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_hiting_death_2019_vij1_7204297

अहमदनगर- मारहाणीत जखमी झालेल्या
युवकाचा मृत्यू , आरोपींना अटक झाली नसल्याने पोलिसांवर नाराजी..

अहमदनगर-  किरकोळ वादातून केलेल्या हल्ल्यात प्रेम ऊर्फ किरण जगताप याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. प्रेम याच्यावर 29 एप्रिलला पुणे बस स्थानकासमोर किरकोळ वादातून काही युवकांनी हल्ला केला होता. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना तो कोमात होता. डॉक्टरांनी आज त्याला सकाळी मृत घोषित केले. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टेशन रोड परिसरात तणावाचे वातावरण  आहे. मृत प्रेमचे शव शवविच्छेदना साठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांनी या मारहाण प्रकरणी त्याच वेळी गुन्ह्याची नोंद केली आहे. परंतु घटनेला एक महिना उलटला असला तरी एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटना होवुन 1 महिना होवुन ही पोलिसांना आरोपी मिळत नसल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत शंका व्यक्त करत नातेवाईक रोष व्यक्त करत आहेत. या प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली आहे.
प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेंशनचे पोलिस निरीक्षकांंची तत्कांळ बदली करावी तसेच आरोपीना तत्कांळ अटक करावी अन्यथा मुतदेह ताब्यात घेणार नसल्यांचा ईशारा दिलांय.या बाबत पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना या घटने बाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिलांय.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मारहाणीत जखमी झालेल्या
युवकाचा मृत्यू , आरोपींना अटक झाली नसल्याने पोलिसांवर नाराजी..
Last Updated : Jun 4, 2019, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.