ETV Bharat / state

महिलेने आपल्याच जाऊच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले

सरपण तोडण्याच्या किरकोळ कारणावरुन महिलेने आपल्याच जाऊच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील मनोली येथे घडली.

woman-poured-diesel-on-her-jau-and-set-it-on-fire
महिलेने आपल्याच जाऊच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले
author img

By

Published : Mar 19, 2021, 4:15 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - सरपण तोडण्याच्या किरकोळ कारणावरुन महिलेने आपल्याच जाऊच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील मनोली येथे घडली. या घटनेत अर्चना शिंदे या साठ टक्के भाजल्या असुन तांच्यावर प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रक्रुती चिंताजनक आहे. त्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात पीडितेची जाऊ आकांक्षा शंकर शिंदे, सासू हरणाबाई नाना शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

सुधाकर मांडवकर, पोलीस निरीक्षक

संगमनेर तालुक्यातील मनोली येथे अर्चना सदाशिव उर्फ दत्तू शिंदे ही महीला आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असुन तीच्या शेजारीची तीची जाऊ आकांक्षा राहते. त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. वडिलोपार्जीत जमीनीच्या वाटण्या झाल्यानंतर अर्चनाच्या पतीला शारीक व्याथी झाल्याने उपचारासाठी त्यांच्या हिश्यातील जमीनही विकली होती. त्यामुळे या दोन कुटुंबात वाद सुरू होते.

पीडिता जबाबात काय म्हणाली-

11 मार्च रोजी अर्चना घराशेजारी सरपण तोडत असताना जाऊ आकांक्षा ही तेथे आली आणि आमचे सरपण तोडू नको म्हणत तिने आपल्या नवऱ्याला फोन केला. फोनवरुन दीराने सुद्धा मला आमचे सरपण आहे. तोडू नको नाहीतर पैसे दे, असे म्हटले. मात्र मी माझे सरपण असल्याने मी तोडणार म्हटल्यावर, जाऊ आकांक्षाने कुऱ्हाडीच्या दांड्याने मला मारहाण केली. त्यानंतर कायमचीच कटकट मिटवू म्हणत घरातील डिझेलचा डबा आणला. यावेळी सासू हरणाबाई हिने माझे दोन्ही हात धरले आणि जाऊने माझ्या अंगावर डिझेल ओतून आग लावली. त्यामुळे मी आरडा ओरडा केल्याने माझ्या मुली घराबाहेर आल्या त्यांनी पाणी आणून मला लागलेली आग विझवली. त्यानंतर पतीने मला प्रवरा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले, असे पोलीसांनी नोंदवलेल्या जबाबात अर्चना सदाशिव उर्फ दत्तू शिंदे म्हणाल्या आहे.

हेही वाचा- एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.