अहमदनगर - भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून सोमवारी रात्री विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता 34 हजार 125 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूरसदृश्य स्थिति निर्माण झाली आहे.
हेही वाचा-संगमनेर तालुक्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रवरा नदीवरील सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास निळवंडे धरणाचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा-नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात; एकाच कुटुंबातील 2 ठार, १५ जखमी
प्रवरा नदीत भंडारदरा धारणातून 21 हजार 244 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर ओझर बंधाऱ्यातून 9833 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात 12 हजार 166 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. भीमा नदीतून 42 हजार 138 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर घोड धरणातून 600 क्यूसेक व मुळा धारणातून 2 हजार क्यूसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा-#Video: गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचले पोलीस!