ETV Bharat / state

शिर्डीमध्ये जलसंकट; कोपरगावला 12 दिवसाआड पाणी पुरवठा

अहमदनगर उत्तर जिल्ह्यामध्ये प्रंचड पाणीटंचाई असल्यामुळे नागिरकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे.

author img

By

Published : May 27, 2019, 6:36 PM IST

शिर्डीमध्ये जलसंकट; कोपरगावला 12 दिवसाआड पाणी पुरवठा

अहमदनगर - अहमदनगर उत्तर जिल्ह्यामध्ये प्रंचड पाणीटंचाई असल्यामुळे नागिरकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील 6 तालुक्याच्या ठिकाणासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. त्यामुळे जून महिन्यात पाण्याचे एकच रोटेशन होणार असल्याचे माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. सध्या दोन्ही धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाण्याची स्थिती

  • 1 ) राहाता - तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. शिर्डी, राहाता लोणी या शहरांना 1 दिवसाआड नगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो.
  • 2 ) कोपरगाव - गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहराला गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेकडून 17 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, शहरातील नागरिकांनी यासाठी मोठे आंदोलन केल्यानंतर 17 दिवसानंतर आता 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. त्याबरोबरच येथील ग्रामीण भागातही शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 3 ) संगमनेर - तालुक्यातील पठार भागात पिण्याच्या पाण्याची बिकट परस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी, नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. संगमनेर शहरात मात्र नगरपालिकेकडून दररोज 40 मिनटे पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 4 ) अकोले - भंडारदरा-निळवंडे या धरणाच्या कुशीत हा तालुका वसला असला तरी या ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. अकोले शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून ग्रामीण भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 5 ) श्रीरामपूर - तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तर श्रीरामपूर शहराला दररोज नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागात टँकरद्वारेही शासनाकडून पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 6 ) नेवासा - तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर नेवासा शहराला 4 दिवसाआड नगरपालिकेकडून पाणी पुरवठा होत आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ अहमदनगर उत्तर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धारण लाभ क्षेत्रातील नागिरकाना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन फिरण्याची परिस्तिथी काही भागात निर्माण झालीय तर काही भागात पाण्याची जैसे ते तसी परिस्तिथी आहे..अहमदनगर उत्तर भागातील सहा तालुक्यातील काही शहरा बरोबर ग्रामीण भागात पिण्याची पाण्याची बिकट परिस्तिथी निर्माण झालीय....

1 ) राहाता_तालुक्यातील काही ग्रामीण भागात शासनाकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात असून शिर्डी,राहाता लोणी या शहरांना 1 दिवसाआड नगरपालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहेत....

2 ) कोपरगाव_तालुक्यात हा गोदावरी नदीकाठी बसलेल्या असताना ही कोपरगाव शहराला गेल्या काही महिन्यापासून 17 दिवसाआड पाणी पुरवठा नगरपालिकेकडून केला जात होते मात्र शहरातील नागरिकांनी मोठे आंदोलन केली त्यावेळी 17 चे आता 12 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे तसेच ग्रामीण भागात शासनाकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे....

3 ) संगमनेर _ तालुक्यातील पठार भागात पिण्याच्या पाण्याची बिकट परस्थिती निर्माण झाली आहे शासनाकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात असल्या तरी पाण्यासाठी वन वन फिरण्याची परस्थिती अजून ही नागरिकांची असलेली पहिला मिळत आहे,संगमनेर शहरात मात्र दररोज 40 मिनटं नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरातील नागरिकांना दुष्काळी परिस्थिती मात्र जाणवत नसल्याच दिसत आहे....

4 ) अकोले_ हा तालुका तर थेट भंडारदरा निळवंडे या धरणाचा कुशीत वसलेले असला तरी या ही ठिकाणी पिण्याचा पाण्याची परिस्तिथी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली पहिला मिळत तर अकोले शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून ग्रामीण भागात शासनाकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे....

5 ) श्रीरामपुर _ तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पिण्याच्या पाण्याची परस्थिती जैसे की तैसे पहिला मिळत असताना श्रीरामपुर शहराला दररोज नळाला पिण्याचे पाणी नगरपालिके कडून सुरू असल्याच नागरीकांना कडून सांगण्यात येत आहे....तसेच काही भागात टँकर द्वारे ही शासना कडून पाणी पुरवठा केला जात आहे....यामुळे या तालुक्यात पाण्याची बिकट परस्थिती निर्माण झाली असल्याच म्हणता येणार नाही....

6 ) नेवासा _ तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू असून नेवासा शहराला चार दिवसाआड नगरपालिके कडून पाणी पुरवठा सुरू आहेत....

VO_ भंडारदरा आणि निळवंडे धरणात पाणी साठा कमी राहिला असून येत जून महिन्याचे एकच रोटेशन होणार असल्याच कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी माहिती दिली आहे..जून पर्यंत पुरेल इतका पाणी साठा दोन्ही धरणात राहिला असल्याच देशमुख म्हणाले आहेत तसेच एकच रोटेशनच साठा दोन्ही धरणात शिल्लक असून एक पिण्याचा पाण्याचे रोटेशन होणार असून हे रोटेशन सोडल्या नंतर धरणात पाणी शिल्लक राहणार नसल्याच देशमुख यांनी सांगितले आहेत....

VO_ अहमदनगर उत्तर भागातील सहा तालुक्यातील पिण्याची पाण्याची परस्थिती आपण पहिली आहे मात्र हाच तो जिल्हा आहे की तो मराठावाड्याची तहान भागवत असतो मात्र आज याच जिल्हातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन फिरण्याची परस्थिती निर्माण झाली असून आम्हाला कोणी पिण्याचे पाणी देणार का ही म्हणायची वेळ आता उत्तर अहमदनगर भागातील नागरिकांनावर आलेली पहिला मिळत असतानाचा भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणातून एकच रोटेशन इतका पाणी साठा शिल्लक राहिल्याने येणाऱ्या काळात पाऊस लवकर नाही पडला तर एक एक थेंब पाण्यासाठी नागरिकांना तरसवा लागणार हे मात्र खर....
Body:MH_AHM_Shirdi Water PKG Story_27 My_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Water PKG Story_27 My_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.