अहमदनगर - बदल्यांच्या बदल्यात 1500 कोटींचा घोटाळ्या झाल्याच समोर आल्यानंतर या घोटाळ्यात नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्यानंतर मृदू भाषी समजल्या जाणारे बाळासाहेब थोरात म्हणाले की, विखे पाटील नैराश्याचा खोल गरतेत गेले आहे. विखे पाटील काय बोलतात त्यांचाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तुम्ही पण दुर्लक्ष करा. यावर विखे पाटलांनी आज जोरदार प्रतिउत्तर देत मी थोरांतचे नाव घेतले नव्हते, मग त्यांनाच का नैराश्य आले. आपले नाव भ्रष्टाचाराच्या यादीत आहे, याची भीती थोरांना वाटते का, असा सवालही विखे पाटील यांनी केला.
'विखेंच्या आरोपांनकडे मी लक्ष देत नाही' -
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांनवर राजकीय चिकलफेक दोघांत नेहमी होत असते. मात्र, काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर येत आहते. यात नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचेही नाव असून लवकरच कोणाला किती महसूल मिळाला, असा गैफ्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी करत अंगुली निर्देश थोरातांच्या दिशेने केल्याने या बाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ठाण्यात आणि नंतर संगमनेरातही थोरांतानी विखेंना नैराश्य आले त्यातून ते आरोप करत आहेत. त्याच्या आरोपांनकडे मी ही लक्ष देत नाही आणि तुम्हीही लक्ष देवू नका, अशी उपाहासात्मक टीका केली.
'मग थोरातांना भीती का वाटते आहे' -
राधाकृष्ण विखे पाटलांनीही आता थोरातांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी मंत्री म्हणून मी थोरातांचे नाव कुठेच घेतल नव्हते. मग थोरातांना भीती का वाटते आहे. ते नैराश्यात का गेलेत, असा उलट सवाल विखे पाटलांनी करत त्यांनी जर भ्रष्टाचार केला नाही, तर ते नैराश्यात का गेलेत, त्यांनी बदल्यात पैसे घेतले नाही, जमिनीत पैसे घेतले नाही, भूखंडात पैसे घेतले नाही, स्टॅम्प ड्युटीमध्ये पैसे घेतले नाही, त्यांचे कुठलेही नातेवाईक भ्रष्टाचारात नाही, हे थोरातांनी जाहीर करावे, असे आवाहन देतानाच थोरातांचा या घोटाळ्यात समावेष असल्याचा जणू खुलासाच विखे पाटलांनी केला.
'पवारांनी मलिकांचा राजीनामा घ्यायला हवा' -
राज्यातील मंत्र्याचे आणि त्यांचा नातेवाईकांचे दररोज भ्रष्टाचार आणि दलाली बाहेर येत आहे. दुसरीकडे समीर
वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना मंत्री नवाब मलीक खुली धमकी देत आहेत. शाहुरुख खानच्या मुलाचे प्रकरण
मलिकांनी उक्त घेतल आहे का, असा सवाल विखेंनी करत शरद पवारांनी मलिकांचा राजीनामा घ्यायला हवा. मात्र, पवारच मलिकांच्या जावायाकडे वनस्पती सापडल्याचे सांगत पाठराखण करत आहेत. शरद पवार लाखो रुपये कमवून देणारी, अशी कोणती वनस्पती आहे. ती आमच्या शेतकऱ्यांनाही द्या, असा सवालही विखे पाटील यांनी केला आहे.
'केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल' -
महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे, अशी झाली असून काहीही झाले, तरी केंद्राकडे बोट दाखवायचे एवढाच धंदा त्यांचा सुरु आहे. लसीकरण जास्त झाले, तरी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतही राज्य सरकार दुजाभाव करीत आहे. विरोधकांच्या कारखान्यांना थकहमी नाकारली जात आहे. मात्र, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - आर्यनच्या आरोग्याबद्दल जेलमधील अधिकारी चिंतेत