अहमदनगर - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबळक बायपास रोडवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची तिच्या गळ्यातील ओढणीने अज्ञात व्यक्तीने गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा... धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या
निंबळक बायपास रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या पुढे ओढ्यात या अनोळखी महिलेला हत्या करून फेकल्याचे आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.