ETV Bharat / state

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीचे 2 अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराने या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार अहमदनगर लाच-लुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार अनुसूचित जमाती प्रमाणापत्र तपासणी समिती नाशिकचे उपसंचालक रामचंद सोनकवडे आणि विधी अधिकारी शिवाप्रसाद काकडे हे अधिकारी ही लाच स्विकारण्यासाठी मुख्यालय सोडून शिर्डीला आले होते.

अहमदनगरमध्ये 2 अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
author img

By

Published : Sep 5, 2019, 6:01 PM IST

अहमदनगर - अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीतीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) रंगेहात पकडले आहे. या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे एस टी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणात मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. रामचंद सोनकवडे आणि शिवाप्रसाद काकडे, अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अहमदनगरमध्ये 2 अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा- सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांना १२०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार अहमदनगर लाच-लुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार अनुसूचित जमाती प्रमाणापत्र तपासणी समिती नाशिकचे उपसंचालक रामचंद सोनकवडे आणि विधी अधिकारी शिवाप्रसाद काकडे हे अधिकारी ही लाच स्विकारण्यासाठी मुख्यालय सोडून शिर्डीला आले होते. येथील साई आसरा हॉटेल मध्ये त्यांनी तक्रादारास पैसे घेवुन बोलवले. त्यावेळी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हॉटेल साई आसरा समोर सापळा रचत एसीबीचे अहमदनगरचे पोलीस उपअधिक्षक हरीश खेडकर यांनी आपल्या पथकासह या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.

हेही वाचा- परभणीत 10 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी उपसरपंचास अटक

यामध्ये पोलिसांनी नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे खासगी व्यक्ती सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड, यांना अटक केली आहे. या सर्वांना कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबीने पाच लाखाची लाज स्विकारतांना रात्री शिर्डीत रंगेहाथ पकडलंय....

VO_ नगर जिल्ह्यातील तक्रारसदाराला एस टी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणात मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती त्या नंतर तक्रार दाराने अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रारी केली होती अनुसूचित जमाती प्रमाणात तपासणी समिती नाशिकचे उपसंचालक रामचंद सोनकवडे आणि विधी अधिकारी शिवाप्रसाद काकडे हे अधिकारी ही लाच स्विकारण्या साठी मुख्यालय सोडुन शिर्डीला आले होते येथील साई आसरा हॉटेल मध्ये त्यांनी तक्रादारास पैसे घेवुन बोलवले होते रात्री एक वाजेच्या सुमारास शिर्डीत हॉटेल साई आसरा समोर सापळा रचत एसीबीची अहमदनगरचे पोलीस उपअधिक्षक हरीश खेडकर यांनी आपल्या पथकासह ही कार्यवाही केली आहे....अटक केलेल्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (रा.वसंत विहार, फ्लॅट नं.१३, पाचवा मजला, बडदेनगर, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), खाजगी इसम सचिन उत्तमराव महाजन (वय ३३ वर्ष, धंदा खाजगी चालक, रा.वसंत विहार, फ्लॅट नं. ११, चौथा मजला, बडदेनगर, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), मच्छिंद्र मारुती गायकवाड (वय ४८ वर्ष, धंदा. नोकरी, लॅब बॉय, वर्ग ४, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, एम.आय.डी.सी.) यांचा समावेश आहे.या सर्वांना कोपरगाव येथील न्यायालया समोर हजर करण्यात आलय....Body:mh_ahm_shirdi_acb action_5_visuals_Exclusive_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_acb action_5_visuals_Exclusive_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.