अहमदनगर- अकोला जिल्ह्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दोन गटात दगडफेकीची घटना शेवगावमध्ये घडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान रात्री आठच्या सुमारास दगडफेक झाली. या दगडफेकीत बंदोबस्तावर असलेले चार पोलीस जखमी झाले आहेत. दोन्ही गटाने एकमेकावर दगडफेक केल्याचे आरोप केले आहेत. परिसरात तणाव वाढत असताना पोलिसांनी कारवाई करत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सध्या परिसरात शांतता आहे.
शांततेला सुरुंग लावणाऱ्या १०२ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. अनियंत्रित झालेल्या जमावाने दुकानांचे आणि वाहनांचे नुकसान केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरात सायंकाळी सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली होती. अशा स्थितीत अफवा पसरल्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे सर्वांची एकच पळापळ झाली.
31 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात- जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही त्यांनी हल्ला चढवित तोडफोड केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनी कारवाई करत 50 जणांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रात्री घटनास्थळाची पाहणी केली आहे. सकाळी 10 वाजता परत शेवगाव येथे घटनास्थळी भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. दगडफेकीच्या घटनेनंतर 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी स्वत: दुकानांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील समाजकंटकावर वेळीच कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
हेही वाचा-
Aurangabad News: लिफ्टमध्ये खेळताना डोके अडकून तेरा वर्षीय मुलाचा करुण अंत