ETV Bharat / state

साई संस्थान प्रकरण: अखेर तृप्ती देसाईंच बंड तात्पुरतं थंड, ४ तासांनी सुटका, शिर्डीत फटाके फोडून जल्लोष - तृप्ती देसाई

साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहराव करण्याचे आवाहन साई संस्थानाने केले. यासंबंधी मंदिराच्या आवारात फलक लावण्यात आले होते. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेत शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिला. अखेर देसाई यांना सुपे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या शिर्डीत पोहोचू न शकल्याने मंदिर परिसरात जमलेल्या शिवसेना, भाजपा आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

trupti desai in shirdi
साई संस्थान प्रकरण : अखेर तृप्ती देसाईंच बंड तात्पुरतं थंड...शिर्डीत फटाके फोडून जल्लोष
author img

By

Published : Dec 10, 2020, 5:48 PM IST

Updated : Dec 10, 2020, 6:12 PM IST

अहमदनगर - साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहराव करण्याचे आवाहन साई संस्थानाने केले. यासंबंधी मंदिराच्या आवारात फलक लावण्यात आले होते. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेत शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिला. यावर शिर्डीतील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला. स्थानिक शिवसेनेच्या महिला देखील आक्रमक होत त्यांनी देसाई यांना धमकीवजा इशारा दिला. अखेर आज तृप्ती देसाई शिर्डीसाठी निघाल्यानंतर त्यांना सुपे पोलिसांनी नगर हद्दीत ताब्यात घेतले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत सर्वांना ताब्यात घेतले. सुमारे ४ तासांनी तृप्ती देसाई यांची सुटका करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा शिर्डीला येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, तृप्ती देसाई यांना अटक केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या ४० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना 11 तारखेपर्यंत शिर्डीत येण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र स्वत:च्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी शिर्डीकडे कूच केले. यानंतर अहमदनगर पोलीस प्रशासनाने त्यांना सुपे हद्दीत ताब्यात घेतले. देसाई यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

साई संस्थान प्रकरण : अखेर तृप्ती देसाईंच बंड तात्पुरतं थंड...शिर्डीत फटाके फोडून जल्लोष
साई संस्थानाने केलेल्या आवाहनाला भाविक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता. तसेच ब्राह्मण महासंघानेही या भूमिकेला समर्थन दिले होते. त्यामुळे देसाई विरुद्ध ब्राह्मण महासंघ, शिवसेना महिला आघाडी, मनसे आणि भाजपा असे समीकरण तयार झाले. साई संस्थानचे समर्थन करत देसाईंना या सर्व राजकीय संघटनांनी विरोध एकत्र येत विरोध केला. मात्र आज देसाई शिर्डीकडे निघाल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवल्याने सध्या हे प्रकरण थंड झाले आहे. मात्र येणाऱ्या काळात देसाई काय भूमिका घेतात, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

प्रशासनाची नोटीस

शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत प्रवेशबंदी केली होती. तरीही आदेश धुडकावून शिर्डीत येण्याची तयारी देसाई यांनी केली. त्यांनी शिर्डीत येण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली होती. शिर्डीतही मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. सकाळीच सर्व फलकांना संरक्षणही देण्यात आल होतं. शिर्डीत ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते जमा झाले होते. देसाई आल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील तयार होत्या. त्यात भाजपा महिला आघाडी देखील सामील झाली. दरम्यान, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तर साई संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी केलेल्या आवाहनाचे थेट नियमात रुपांतर करून भारतीय पेहराव सक्तीचा करण्याचे सुचवले आहे.

Last Updated : Dec 10, 2020, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.