ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यातील ३०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५ टक्के - ahmednagar new covid 19 cases

अहमदनगर जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २ हजार ७२१ इतकी झाली.

ahmednagar corona update
अहमदनगर जिल्ह्यातील ३०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५ टक्के
author img

By

Published : Jul 30, 2020, 11:08 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात बुधवारी २६१ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना चाचणी प्रयोगशाळेत ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत कोरोनाबाधित आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २ हजार ७२१ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६५.०२ टक्के इतके आहे.

दरम्यान बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ८५ रूग्ण आढळले होते. यात नेवासा (४), राहुरी (1), जामखेड (1), राहता (६),भिंगार (४), कर्जत (१०), नगर शहर (७), अकोले (१६), कोपरगाव (1), पाथर्डी(17), संगमनेर (१७), श्रीगोंदा (१) आदी रुग्णाचा समावेश होता. त्यानंतर सायंकाळपर्यंत नव्या १२ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली. यामध्ये, नेवासा (२) - नेवासा शहर २, शेवगाव(३)- शेवगाव शहर ३, कर्जत (५)- राशीन ५, श्रीगोंदा (२)-तांदळी दुमाला २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, कोपरगाव ०१, नेवासा ०४, कॅन्टोन्मेंट ०१, श्रीरामपूर १०, नगर ग्रामीण ०६, राहाता ०२ या रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या १४० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १०१, कर्जत ०२, राहुरी ०१, अकोले ०१, श्रीगोंदा ०३, नेवासा ०१, कँटोन्मेंट ०१, श्रीरामपूर ०९, नगर ग्रामीण ०३, पाथर्डी ०३, राहाता ०५, संगमनेर येथील १० रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, ३०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२, पाथर्डी ६७, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर २३,कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२,पारनेर ०२,राहुरी ०२, शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांस आज घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती -

- बरे झालेली रुग्ण संख्या:२७२१
- उपचार सुरू असलेले रुग्ण: १४०४
- मृत्यू: ६०
- एकूण रुग्ण संख्या: ४१८५

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.