अहमदनगर - शनि-शिंगणापूर हे एक आगळे-वेगळे गाव आहे. या गावात पाचशे वर्षांपूर्वी पावसाने गावातील पानसना ओढ्याला महापूर आला होता. या पुरात एक दगडी शिळा वाहून आल्याचा इतिहास आहे. ही शिळा बोराच्या झाडाला अडकलेली असल्याचे स्वप्न एका वृद्धास पडले. या दगडी शिळेला मामा-भाच्याने हात लावला, तेव्हा ती जागेवरून हालते, असे त्याच्या स्वप्नात आले होते. यानंतर गावातील पानस ओढ्यातून ही शिळा काढून जवळच तीची स्थापना करण्यात आली. कालांतराने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करावी या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले. मात्र, देवाने पुन्हा दृष्टांत देत मंदिर बांधू नये असे सांगितले. त्यामुळे ही शिळा आजही एका दगडी चौथऱ्यावर आहे असा इतिहास येथील नागरिक सांगतात.
हेही वाचा- सोनू सुदला मुंबई हायकोर्टाने फटकारले, "संकटकाळात तुम्ही एखादा देवदूत असल्यासारखा वावर होता"
'श्री सूर्यपुत्र शनिदेव' हा चित्रपट दाखविण्यात आला'
सन (१९९३)साली एका दूरचित्रवाणी वाहिनीवर 'श्री सूर्यपुत्र शनिदेव' हा चित्रपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर शनि शिंगणापूर हे गाव सगळीकडे नावारुपाला आले. तेव्हापासून या गावाला भेट देण्यासाठी लोकांची ये-जा सुरु झाली. त्या पूर्वीही लोक येथे येत असत. मात्र, त्यांची संख्या कमी होती. सध्या रोजच दर्शनासाठी लोक गर्दी असतात. रोज दहा ते वीस हजार, शनिवारी (८०) हजार ते (१) लाखापर्यंत भाविक येतात. शनिवारी अमावस्या आली तर येथे जत्रा भरते. तर, शनि अमावस्येला सुमारे (८ ते १०) लाख भाविकांची गर्दी होते.
हेही वाचा- नवरा इंजिनिअर, पगार १.५ लाख, तरीही बायकोने रचला १ Cr खंडणीचा कट
'घरांना दरवाजा व कुलपांचा वापर नसतानाही चोरी होत नाही'
गावच्या अख्यायिकेमध्ये स्वयंभू शनिमूर्ती उघड्यावर असल्याने, गावातील घरांनाही दरवाजा, कडी-कुलूप नाही. येथे चोरी होत नसल्याचे सांगितले जाते. पूर्वी घरांना केवळ पडदे असत, आता वाढत्या नागरिकरणामुळे आणि हॉटेल व्यवसायांच्या ठिकाणी पडद्यांच्या जागी सरकते प्लायवूड वापरले जात आहे. येथील घरांना दरवाजा व कुलपांचा वापर नसतानाही येथे चोरी होत नाही. येथे सन (2011) साली युको बँकेने आपली शाखा उघडल्यानंतर त्या शाखेलाही दरवाजा बसवला नाही. तसेच, लॉकरही ठेवलेले नाही. यामुळे शनि शिंगणापूरला आगळे-वेगळे गाव म्हटले जात आहे. या बँकेत सध्या (७) हजार खातेदार, ठेवी- (२२ ते २४) कोटी, कर्जवाटप- (२६) कोटी अशी बँकेची परिस्थिती आहे. या बँकेत शनैश्वर देवस्थान, ग्रामपंचायत व हाॅस्पिटल कर्मचारी, ग्रामस्थ व परिसरातील व्यक्तींचाही खातेदार म्हणून समावेश आहे.
हेही वाचा- हातावर मेहंदी लागन्याआधीच कोरोनाने केला घात, आईनंतर अवघ्या १० दिवसांत मुलीचंही निधन
'पानसनाला प्रकल्पाचे काम सुरू'
शनि शिंगणापूरच्या मंदिरासाठी सन (१९६३)मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. त्यावेळी पाच जणांचे विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले होते. चौथी शिकलेले स्व. बाबुराव बानकर सलग तीस वर्षे अध्यक्ष म्हणून होते. शनि शिंगणापूरच्या जडण-घडणीमध्ये बानकर यांचा खूप मोठा वाटा आहे. सध्या देवस्थान ट्रस्टच्यावतीने हाॅस्पिटल, माध्यमिक विद्यालय, भक्त निवास, गोशाळा, वारकरी निवासी शाळा, पंढरपूर येथे मंगल कार्यालयसह विविध उपक्रम आहेत. सध्या येथे भव्य पानसनाला प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथील नवग्रहस्तंभ महाराष्ट्रात सर्वाधिक उंच आहे.
हेही वाचा- नागपुरात तालिबानी शिरकाव, अफगाणी नागरिकाला अटक, तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर करत होता फॉलो