ETV Bharat / state

कोरोनाची आकडेवारी लपवणाऱ्या राज्यांमध्ये मृतदेह गंगेच्या कडेला साचले - महसूलमंत्री थोरात

संगमनेर येथील थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाले. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी कोरोनाची आकडेवारी लपवली त्या राज्यांचे मृतदेह गंगेच्या कडेला साचले होते, अशी टीका त्यांनी भाजपाशासित राज्य सरकारवर केली.

oxygen production project in thorat sugar factory
कोरोनाची आकडेवारी लपवणाऱ्या राज्यांचे मृतदेह गंगेच्या कडेला साचले - महसूलमंत्री थोरात
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:19 AM IST

संगमनेर (अहमदनगर) - कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी कोरोनाची आकडेवारी लपवली त्या राज्यांचे मृतदेह गंगेच्या कडेला साचले होते, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केली आहे. तसेच अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नाही. प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, अशा परिस्थितीत थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प दिशादर्शक असल्याचे मतही थोरांत यांनी व्यक्त केले.

थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.

oxygen production project in thorat sugar factory
थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

थोरात कारखाना हा तिसऱ्या क्रमांकाचा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना -

यावेळी थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी उपाययोजना करत काम केले आहे. या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून कोणीही हलगर्जीपणा करू नका. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टास्क फोर्सच्या मते, तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात ५० लाख रुग्ण असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसर्‍या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे राज्य सरकारने तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये राज्यातील २३ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर कारखान्यांमधून थोरात कारखाना हा तिसऱ्या क्रमांकाचा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. मागील कोरोना लाटेमध्ये ५०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करताना सर्व सहकारी संस्थांनी अत्यंत मदतीची भावनेतून काम केले.

२०२२ च्या पावसाळ्यात दोन्ही कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात -

या ऑक्सिजन निर्मिती प्लांटमधून दररोज ८५० किलो ऑक्सिजन निर्माण होणार आहे. तो १०० रुग्णांना पुरेल इतका हा ऑक्सिजन आहे. याचबरोबर निळवंडे धरणाचा जवळील पहिल्या बोगद्याचे ब्लास्टिंग करून हा बोगदा खुला करण्यात आला. हा एक सुवर्णयोग आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाला अत्यंत गती दिली आहे. २०२२ च्या पावसाळ्यात या दोन्ही कालव्याचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचवण्यासाठी अत्यंत गतीने काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

खासगी हॉस्पिटलने सुद्धा स्वत:चे ऑक्सिजन प्लांट निर्माण करावेत - आमदार डॉ. तांबे

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक तरूण मृत्यू पावले. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. तिसऱ्या लाटेचा मोठा धोका असलेल्या प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने नेहमीच मदतीच्या भावनेतून काम केले आहे. हवेत ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पामुळे १०० रुग्णांचा दिलासा दररोज मिळणार आहे. आगामी काळात मोठ्या खासगी हॉस्पिटलने सुद्धा स्वत:चे ऑक्सिजन प्लांट निर्माण करावेत, असे आमदार डॉ. तांबे यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.