ETV Bharat / state

Manufacturers increased the Dynasty slavery: कारखानदारांनी घराणेशाही, गुलामी वाढविली. साखर गुलामी पुस्तकाचे प्रकाशन - कारखानदारांनी घराणेशाही व गुलामी वाढविली

सहकार म्हंटल की शेतकऱ्यांना मदत व्हावी (To help the farmers) यासाठी निर्माण केलेली व्यवस्था मात्र आज याच कारखानदारांनी घराणेशाही व गुलामी वाढविली (Manufacturers increased the Dynasty) असून यावर भाष्य करणारे ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत लिखित साखर गुलामी (Release of sugar slavery) या पुस्तकाचे प्रकाशन आज शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या हस्ते करण्यात झाले.

Release of sugar slavery
साखर गुलामी पुस्तकाचे प्रकाशन....
author img

By

Published : Dec 12, 2021, 5:20 PM IST

शिर्डी:अकोले शहरातील साई लौन्स मध्ये आज ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी लिहिलेल्या साखर गुलामी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. जेष्ठ विचारवंत विजय जावंधिया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, किसान सभेचे अजित नवले ही उपस्थित होते.

साखर गुलामी पुस्तकाचे प्रकाशन
कोणतेही सरकार आले तर ते शहरी भागाचा विचार करते. 2 रुपये किलो धान्य याचा गवगवा केला जातो मात्र शेतकऱ्यांचा विचार आज पर्यत केला गेला नाही अशी टीका विजय जावंधिया यांनी यावेळी बोलताना केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यानंतर विकासाची चळवळ म्हणून सहकारी साखर कारखाने सुरू झाले. त्यावेळी हेतू शुद्ध होता व त्याचा फायदा सुद्धा झाला मात्र त्यानंतर प्रत्येक बॉयलर मधून साखर आणि शिक्षण सम्राट जन्माला आले.आणि यातूनच पुढे साखर गुलामी सुरू झाली अशी प्रतिक्रिया साखर गुलामी पुस्तकाचे लेखक दशरथ सावंत यांनी दिली. या पुस्तकातून सावंत यांनी सहकाराचे आजचे बदलत असलेले रूप जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.