ETV Bharat / state

जायकवाडीसह महाराष्ट्रातील 10 धरणे धोकादायक, संयुक्त राष्ट्राचा अहवाल - भंडारदरा

अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा, घाटघर तसेच मराठवाड्यातील जायकवाडी धरण यासह दहा धरण धोकादायक अवस्थेत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.

bhandardara dam
bhandardara dam
author img

By

Published : Mar 23, 2021, 12:53 PM IST

Updated : Mar 24, 2021, 12:41 PM IST

अहमदनगर - देशभरातील अनेक धरणांची परिस्थिती धोकादायक असून त्यात महाराष्ट्रातील दहा धरणांचा समावेश असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने दिला आहे. यात उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा, घाटघर तसेच मराठवाड्यातील जायकवाडी धरणांचा समावेश आहे. या इशार्‍याची दखल घेत सरकारने या धरणांचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे. वय जास्त झाल्यास धरणे धोकादायक होतात. जसं वय वाढेल तसा धोका आणखी वाढत जातो. देशात अशी 1200 धरणे धोकादायक स्थितीत आहेत. त्यातून पुढील काळात मोठा अनर्थ घडू शकतो असे या संस्थेने सर्वेक्षणात नमूद केले आहे.

भंडारदरा धरण धोकादायक

जागतिक बँकेच्या सहाय्याने धरणासाठी 73 कोटीची तरतुद.

केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने भंडारदरा जलाशयाचे 94 व्या वर्षात भाग्य उजळले असून 73 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने जलाशय चकाचक होणार यात शंका नाही. पहिल्या टप्प्यात 15 कोटी निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होईल.

या दशकात बांधण्यात आले भंडारदरा धरण

अकोले तालुक्यातील शेंडी येथील प्रवरा नदीवर सन 1910 ते 1926 या कालावधीत दगडात भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची साठवण क्षमता 11039 दशलक्ष घनफूट असून 300 दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. धरणास 94 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कोयना परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपामुळे 1969 मध्ये धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर 1969 ते 73 या कालावधीत भंडारदरा धरणाचे मजबूतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मुख्य धरणास आधार देणे (Buttresses) प्रिस्ट्रेस केबल बसविणे , सांडव्यामध्ये नवीन वक्राद्वारे बसविणे , सिमेंट ग्राऊटींग करणे तसेच धरणावर वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे बसविणे ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत.1973 ते आजपर्यंत भंडारदरा धरणावर कोणत्याही प्रकारचे विशेष दुरुस्तीची अथवा मजबुतीकरणाची कामे करण्यात आलेली नाहीत.सद्यस्थितीत केंद्रीय जलअयोग आणि जागतिक बँक यांच्या सहाय्याने धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा 2 (ड्रीप 2 ) अंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या 30 प्रकल्पामध्ये भंडारदरा धरणाचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा - परमबीर सिंग यांच्यावर लावलेल्या आरोपांवर ठाम - पोलीस निरीक्षक अनुप डांगे

सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने धरण सुरक्षा पुनर्विलोकन समितीची (डीएसआरपी) स्थापना केली आहे. त्या अनुषंगाने भंडारदरा धरणास धरण सुरक्षा पुनर्विलोकन समिती क्र . 4 (DSRP- IV ) ने दिनांक 27/12/19 व उर्वरित काही सदस्यांनी 31 /1 /20, रोजी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर DSRP चे अध्यक्ष बी. सी. कुंजीर यांनी 7/2/20 रोजी CDO नाशिक येथे झालेल्या बैठकीत भंडारदरा धरणाच्या स्थैर्यतेच्या दृष्टीने योग्य फॅक्टर ऑफ सेफ्टी साठी डायनॅमिक परीक्षण सीडीओ नाशिक यांच्याकडून करून घेण्याबाबत सूचित केले. सदर तपासणीनंतर धरणाच्या स्थैर्यतेच्या दृष्टीने कामे सुचवणे शक्य असल्याचे नमूद केले आहे. तसेच धरणाच्या मुख्य दगडी भिंतीमधून होत असलेली पाणी गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने प्रस्तावात अंतर्भूत करण्यात आल्या.

हेही वाचा - मुंबईत एका महिन्यात तब्बल चार हजार प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

प्रस्तावित कामे
केंद्रीय जल अनुसंधान शाळा (cwprs ) पुणे यांची दि. 9/3/20 रोजी झालेल्या क्षेत्रीय पाहणीचा 10 /8/20 रोजी प्राप्त अहवालाप्रमाणे दगडी धरण सा. क्र . 0 ते 488 मध्ये 3 मी . वर सिमेंट गाऊंटिंग u/s बाजू पासून 0. 9 ते 1. 0 मी. अंतरावर पहिली रांग व पहिल्या रांगेपासून 1. 50 मी अंतरावर दुसरी रांग करणे तसेच सिमेंट ग्राऊटींग मिक्स डिझाईन करणे समािवष्ट आहे. प्रथम धरणास ग्राऊटींग करणे, उभी बाजूस शॉर्टकीट करणे तसेच मूलभूत सुविधांची (पोहच रस्ते व संरक्षक भिंत ) उभारणी / दुरुस्ती करणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तर विश्राम ग्रह सांडवा भिंत,आधुनिक भूकंप मापन केंद्र निळवंडे प्रमाणे नवीन डिझाईन पद्धतीने भंडारदरा जलाशयाची कामे होणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.

Last Updated : Mar 24, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.