ETV Bharat / state

नगरच्या मतदारांनी माझा खासदार होण्याचा हट्ट पुरवला, सुजय विखेंचा पवारांना टोला - election

त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा पराभव म्हणजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एक मोठी चपराक असल्याचे मानले जाते. आज विजयाची खात्री पटल्यानंतर सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

नगरच्या मतदारांनी माझा खासदार होण्याचा हट्ट पुरवला, सुजय विखेंचा पवारांना टोला
author img

By

Published : May 24, 2019, 8:14 AM IST

अहमदनगर - राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुजय विखे-पाटील यांनी अखेर विजयी बाजी मारली आहे. हा विजय जवळपास एकतर्फी असाच म्हणावा लागेल. त्यांना तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍य मिळाले आहे.

सुजय विखे

त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा पराभव म्हणजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एक मोठी चपराक असल्याचे मानले जाते. आज विजयाची खात्री पटल्यानंतर सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. हा विजय माझे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे यांना समर्पित करत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातल्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागातील कार्यकर्त्यांनी, मतदारांनी आणि युतीच्या दोन्ही पक्षाने केलेल्या मदतीमुळे माझा विजय शक्य झाला, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.