ETV Bharat / state

अंत्यसंस्कारांसाठी चोवीस तास अविरत राबणारे हाथ.. येथे कर माझे जुळती!! - अहमदनगर कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार

दुसऱ्या लाटेत रुग्ण दगावण्याचे प्रमाण काहीसे वाढले असून अनेक परिचित चेहरे अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे कळल्यानंतर मन अजूनच विषण्ण होत आहे. या हतबल परस्थितीत काही हाथ असेही आहेत जे कुठेही न थकता अहोरात्र चोवीस तास काम करताहेत आणि ते म्हणजे स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करणारे हाथ.. अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीत रोज चाळीस-पन्नासच्या आसपास अंत्यसंस्कार करणारे हाथ पाहिले म्हणजे आपल्यालाही त्यांच्याकडे पाहून येथे कर माझे जुळती असे वाटून जाते.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Apr 25, 2021, 9:13 PM IST

अहमदनगर - मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अवघे जग एका अनामिक भीतीने घाबरून गेले होते. मात्र, आता भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेतील हाहाकार पाहता सर्वत्र हतबलता पहावयास मिळत आहे. अशात दुसऱ्या लाटेत रुग्ण दगावण्याचे प्रमाण काहीसे वाढले असून अनेक परिचित चेहरे अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे कळल्यानंतर मन अजूनच विषण्ण होत आहे. या हतबल परस्थितीत काही हाथ असेही आहेत जे कुठेही न थकता अहोरात्र चोवीस तास काम करताहेत आणि ते म्हणजे स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करणारे हाथ.. अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीत रोज चाळीस-पन्नासच्या आसपास अंत्यसंस्कार करणारे हाथ पाहिले म्हणजे आपल्यालाही त्यांच्याकडे पाहून येथे कर माझे जुळती असे वाटून जाते.

अंत्यसंस्कारांसाठी चोवीस तास अविरत राबणारे हाथ..

अहमदनगरची अमरधाम स्मशानभूमी सध्या चोवीस तास धगधगती आहे. शववाहिका, रुग्णवाहिता सायरन वाजत ये-जा, लाकडे-शेणी आणणारे ट्रॅक्टर, मोजक्या नातेवाईकांचे भरलेल्या हुंदक्याचे काळीज चिरणारे रुदन आणि या मन हेलावणाऱ्या वातावरणात आठ-दहा तरुणांची चिता रचण्यापासून त्यावर मृतदेह ठेवून शक्य तेवढ्या धार्मिक परंपरा पाळत अग्निडाग देण्यासाठीची लगबगता. अग्निडाग दिल्यानंतर आलेले मोजके नातेवाईक जडपावलाणे परतून जातात, मात्र ह्या आठ-दहा तरुणांचे हाथ चिता व्यवस्थित पेटती ठेवण्यासाठी कार्यरत राहतात.. बरे हे चक्र इथेच संपत नाही. कारण मधल्या वेळात पुन्हा आठ-दहा मृतदेह स्मशानभूमीत आलेले असतात आणि पुन्हा एकदा हेच अंत्यविधीचे चक्र सुरू राहते.

महानगरपालिका करते अंत्यविधीचा खर्च -

कोरोनाचे संकट वाढले आणि मृत्यूही व्हायला लागले, तेव्हा सुरुवातीपासूनच अहमदनगर महानगरपालिकेने स्वतःच्या खर्चांने सर्वधर्मीय अंत्यविधीचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर रोज चाळीस-पन्नास रुग्ण दगावत असून त्यांच्यावर विद्युत दाहिणीत आणि सरण रचून अंत्यविधी केले जात आहेत. यासाठी नेमलेले कर्मचारी खूप सचोटीने आणि माणुसकी धर्म पाळून काम करत असल्याचे दिसून येत आहे.

रुग्ण वाढले तसे मृतांची संख्यापण वाढली-

कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे, त्यात रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले असल्याने बेड, ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी अक्षरशः वाट पाहावी लागत आहे. ह्या दुष्ट चक्रातून रुग्ण दुर्दैवाने दगावला तर स्मशानभूमीत पण पुन्हा एकदा अंत्यविधीसाठी वाट पहावी लागतेच.. कुठे तरी या आपत्कालीन परस्थितीसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात शासन-प्रशासन कमी पडले असेच म्हणावे लागेल. मात्र, याही परस्थितीत अमरधाम स्मशानभूमीत राबणारे हाथ कुठल्याही यंत्रणेबद्दल का..कू न करता माणुसकी धर्म पाळत आणि आपल्या जीवाची पर्वा न करता चोवीस तास आपले काम करत आहेत. आज मितीला 23 हजार 203 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आता पर्यंत एक हजार आठशे पंधरा रुग्ण मृत झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.