ETV Bharat / state

एसटी कर्मचाऱ्याची बसच्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Oct 29, 2021, 11:22 AM IST

Updated : Oct 29, 2021, 11:52 AM IST

शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय, 56) या एसटी कर्मचाऱ्याने एसटीबसच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे कळते. त्यांचे वय 56 असून त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती प्राप्त होवू शकली नाही.

एसटी
एसटी

अहमदनगर - एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे भत्ता वाढ आदी मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केले आहे. यानंतर आंदोलन मागे झालेले असतानाच आज (शुक्रवारी) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय, 56) या एसटी कर्मचाऱ्याने एसटीबसच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे कळते. त्यांचे वय 56 असून त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती प्राप्त होवू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे समजते. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

एसटी कर्मचाऱ्याची बसच्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या

संघटना-शासनात कालच तडजोड

महाराष्ट्रातील विविध एसटी महामंडळाच्या संघटनेची मुख्य मागणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी आहे. ही मागणी सध्या मान्य करण्यात आलेली नाही. मात्र महागाई भत्यात 28 वाढ, घरभाडे भत्ता यामध्ये शासनाने वाढ केली असून यामुळे राज्य सरकारवर 30 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. शासन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या तडजोडीनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर कालपासून सुरू असलेले एसटी बंद आंदोलन हे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आज शुक्रवारी लगेच शेवगाव आगारात दिलीप हरिभाऊ काकडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बसच्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या
बसच्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या
'शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे'

शेवगाव आगारात दिलीप काकडे यांच्या आत्महत्येबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे आगार सचिव दिलीप लबडे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल बोलताना सांगितले, की आत्महत्या केलेले काकडे हे नेहमी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे यासाठी आग्रही होते. शेवगाव येथे 26 ऑक्टोबरला झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. परवा सुरू झालेला संप या मागणी शिवाय मागे घेतला जाऊ नये, असे त्यांचे मत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने शासनात विलीनीकरण ही मागणी पूर्ण न करता महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढ या मुद्यावर संप मिटवला. त्यानंतर आज शुक्रवारी दिलीप काकडे यांनी एसटी बसला लटकून आत्महत्या केली. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, ही मागणी आग्रही आणि संवेदनशील झालेली आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय शासनाने घ्यावा हीच खरी श्रद्धांजली काकडे यांना असेल, असे संगघटनेचे दिलीप लबडे यांनी स्पष्ट केले. राज्यात आर्थिक विवंचनेतुन 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - दिवाळीच्या पुर्वसंधेला सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, नांदेडच्या जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आवाहन

Last Updated : Oct 29, 2021, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.