ETV Bharat / state

लस घेतल्यानंतरही अहमदनगरमधील सहा पोलिसांना कोरोनाची लागण - बेलवंडी कोरोनाबाधिक पोलीस न्यूज

कोरोना महामारीच्या काळात पोलीस विभागाने आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लाऊन काम केले. त्यामुळे देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लस दिली गेली. मात्र, लस घेतल्यानंतरही काही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची घटना अहमदनगमध्ये समोर आली.

Belwandi Police Station
बेलवंडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 1, 2021, 12:32 PM IST

अहमदनगर - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहा पोलिसांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस घेतलेली आहे.

लसीची परिणामकारकता काही दिवसानंतर -

बेलवंडी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली आहे. एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागला त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली गेली. त्या सर्वांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित पोलिसांमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी आहे. या सर्वांची तब्येत ठीक असून त्यांना विलगिकरणात ठेवले आहे. त्यांना लस दिली असली तरी त्याचा परिणाम सुरू होण्यास पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागतो. मात्र, हे कर्मचारी लस दिल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बाधित झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगावी -

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू आहे. त्यामुळे पोलीस विभागावर पुन्हा कामाचा ताण वाढला आहे. ड्युटीच्या निमित्ताने त्यांना जनतेशी संपर्क करावाच लागतो. त्यामुळे त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.