ETV Bharat / state

Shanishingnapur Devasthan : शनिमंदिरात 'या' चार वस्तूंवर बंदी; शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा निर्णय, भाविकांनी केले स्वागत

author img

By

Published : May 28, 2022, 3:23 PM IST

शनिशिंगणापुरात (Shanishingnapur Devasthan) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक होताना दिसून आले आहे. त्यासंदर्भात वारंवार तक्रारीही करण्यात आल्या होत्या. आता शनिशिंगणापुर देवस्थान ट्रस्टने (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) भक्तांच्या लुटमारीस कारणीभूत ठरत असलेल्या पूजा साहित्यातील चार वस्तूंवर बंदी घातली आहे.

Shanishingnapur
शनिशिंगणापूर

अहमदनगर - जिल्ह्यातील शनिशिंगणापुरात (Shanishingnapur Devasthan) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक होताना दिसून आले आहे. त्यासंदर्भात वारंवार तक्रारीही करण्यात आल्या होत्या. आता शनिशिंगणापुर देवस्थान ट्रस्टने (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) भक्तांच्या लुटमारीस कारणीभूत ठरत असलेल्या पूजा साहित्यातील चार वस्तूंवर बंदी घातली आहे.

या चार पूजा साहित्यांवर बंदी - शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने दर्शनपथ, मंदिर परिसरात पुजेच्या ताटातील यंत्र पायदळी पडल्याचे बघितले. यानंतर त्यांनी या विटंबनेचा व्हिडिओ काढून मंत्रालयातील काही व्यक्तींना पाठवला होता. या व्हिडिओची दखल घेवून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने भक्तांच्या लुटमारीस कारणीभूत ठरत असलेल्या पूजा साहित्यातील शनियंत्र, नवग्रह यंत्र, पादुका व चांदीसारखा दिसणारा शिक्का या चार वस्तू मंदिरात घेवून जाण्यास बंदी घातली आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व पूजा-साहित्य विक्रेत्यांना यंत्र बंदीबाबत सूचना दिली आहे. पुजेच्या ताटात या वस्तू दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असे सुचित केले आहे.

भाविकांकडून स्वागत - सुरक्षा विभागाचे पथक महाद्वारजवळ तैनात करण्यात आले आहे. या धाडसी निर्णयानंतर पूजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. बंदी घातलेल्या वस्तूसह पुजेचे ताट पाचशे ते दोन हजारास विकले जात होते. देवस्थानच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. तसेच यंत्र बंदीचा निर्णय कायमस्वरुपी अमलात राहावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भाविकांकडून आल्या होत्या तक्रारी - शनिशिंगणापूर गावात प्रवेश घेताच भाविकांना एका मोठ्या पार्किंगमध्ये या वस्तू घ्याव्याच लागतील अशी दमदाटी केली जात आहे. अशा स्वरुपाच्या तक्रारी भाविकांनी सुरक्षा विभागाकडे केल्या असल्याचे समजते. शनैश्वर देवस्थानने यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नालविक्री व काळ्या तिळाच्या तेलाबाबत मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेले आहे, असे सांगून पाचशे ते एक हजार रुपये घेतले जातात, अशा वस्तूंवर बंदी घालावी व सक्तीची अडवणूक करीत असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.