अहमदनगर - श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराजांचा यात्रोत्सव सुरु झाला आहे. दरवर्षी आमलकी एकादशीला महंमद महाराजांची यात्रा साजरी केली जाते. श्री संत शेख महंमद महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. मालोजीराजे भोसल्यांनी महाराजांनी गुरू मानले होते. तसेच समर्थ रामदासांनी महंमद महाराजांवर आरती रचली आहे. योगसंग्राम पवनविजय व निष्कलंकप्रबोध या त्यांच्या प्रमुख रचना वारकरी संप्रदायात रूढ आहेत.
अहमदनगर: श्री संत शेख महंमद महाराज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; उत्साहात यात्रेला सुरुवात..
श्री संत शेख महंमद महाराजांचा यात्रोत्सव सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.