शिर्डी : शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना समाधी मंदिरातील समाधीपुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजुस भाविकांना प्रवेश ( Vdarkamai temple) देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येणे-जाणेकरीता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरीगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे ( Changes in Sai Mandir on devotees demand ) आदीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
ग्रामस्थांकडून निर्णयाचे स्वागत : आज शिर्डीच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी या मुद्दयांसंदर्भात सीईओ बानायत यांची भेट घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत व ग्रामस्थांमध्ये सौहार्द पुर्ण वातावरणात चर्चा होवून अनेक विषय मार्गी लागले़ मंदिराची सुरक्षा व प्रशासनाचे कामकाज यांना बाधा न येवु देता ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या होत्या, त्या मागण्या बानायत यांच्याकडून ताबडतोब मान्य करण्यात आल्या. तसेच काही मागण्या टप्याटप्याने स्विकारता येतील असे आश्वासनही बानायत यांनी सर्वपक्षीय ग्रामस्थांना दिले. बैठकीनंतर तत्काळ काचा हटवुन भाविकांना समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेणे सुरू करण्यात आले. ग्रामस्थांनी संस्थान निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले आहेत.
भाविकांचे मानसिक समाधान : या अगोदर व्हीआयपींना काचा काढून दर्शन घेता येत होते. सामान्य भाविकांना मात्र दुरून हात जोडूनच दर्शन घ्यावे लागत होते. यामुळे भाविकांना मानसिक समाधान मिळत नव्हते. या मागण्या संदर्भात अनेक ग्रामस्थांचा तसेच भाविकांचाही साईसंस्थानकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ( Low height glass wall in Sai Mandir) होता. चार दिवसापुर्वी पंजाबात हत्या झालेले भाविक सुरेंद्रकुमार सुरी या मुद्द्यावर उच्च न्यायालयात जाणार होते. परवा यासंदर्भात एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. आजच्या निर्णयांमुळे सामान्य भाविकांचे साईदर्शन आनंददायी होण्यास मदत होणार आहे.