ETV Bharat / state

शिर्डी साईमंदीर खुले करण्यासाठी शिवेसना महिला जिल्हाध्यक्षा मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार

शिर्डीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी साई मंदिर उघडणे हाच पर्याय आहे. यासाठी आपण मुंबईत जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा व शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांनी दिली.

Shirdi Sai temple opening demand
शिर्डी साईमंदीर उघडण्याची मागणी
author img

By

Published : Jul 25, 2021, 8:36 PM IST

अहमदनगर - शिर्डीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी साई मंदिर उघडणे हाच पर्याय आहे. यासाठी आपण मुंबईत जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा व शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांनी दिली.

माहिती देताना शिवेसना महिला जिल्हाध्यक्षा

हेही वाचा - गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर साईभक्तांनी घेतले कळसाचे दर्शन; लेझर शो यंदाच्या उत्सवाचे आकर्षण

देशातील अन्य मोठ्या मंदिरांच्या धर्तीवर साईमंदीर भाविकांसाठी खुले करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही लस घेतलेल्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणीद्वारे संख्या मर्यादित ठेवून व कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शन देता येवू शकेल. यामुळे शिर्डीचा रूतलेला अर्थकारणाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.

साईमंदीर उघडण्यासाठी भाविक आर्त विनवणी करत आहेत. गेल्या दिड वर्षांपासून साईमंदीर बंद असल्याने शिर्डीच्या अर्थकारणाचा कणाच मोडला आहे. साईभक्तांवर अवलंबून असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, हार, फूल, फोटो मूर्ती दुकाने, रिक्षा, टुरिस्ट वाहन व्यवसाय व यावर उपजीविका असलेल्या हजारो कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिर्डीच्या अर्थकारणाचा चाक थांबल्याने बँकांचे हप्तेही थकल आहे, त्यामुळे व्यावसायिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस देण्यात येत आहेत. यामुळे निराशा व भितीचे वातावरण असून आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यासाठी आपण महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व स्थानिक शिवसैनिकांना बरोबर घेवून मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा - कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, राज्य सरकारकडूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.