ETV Bharat / state

अहमदनगरचे अंबिकानगर नामांतर करा, शिवसेना खासदाराची मागणी - Ahmednagar renamed news

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी, अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे.

shiv sena mp wants Ahmednagar to be renamed as Ambika Nagar
अहमदनगरचे अंबिकानगर नामांतर करा, शिवसेना खासदारांची मागणी
author img

By

Published : Jan 3, 2021, 1:16 PM IST

अहमदनगर - औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी शिर्डी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार लोखंडे यांनी, अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितलं.

खासदार सदाशिव लोखंडे बोलताना....

सध्या औरंगाबादच्या नामांतराच्या जुन्याच मागणीला नव्याने फोडणी देण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे या मागणीला विरोधही दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होत असून भाजपाच्या नेत्यांनी या प्रश्नात हवा भरण्यास सुरवात केली आहे. औरंगाबादमध्ये हे सुरू असतानाच शिर्डीचे शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी अहमदनगरच्या नामांतराची जुनीच मागणी पुढे आणली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांकडून अहमदनगरच्या नामांतराची मागणी सुरू आहे. अर्थात त्यावरून काहींमध्ये मतभेद आहे. काहींनी अंबिकानगर तर काहींनी आनंदनगर नाव सूचविले आहे. अंबिकानगर नाव देण्याची मागणी जुनी आहे. यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहे. नगरला पूर्वी भरलेल्या 70 व्या साहित्य संमेलनातही हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

अशी झाली अहमदनगरची स्थापना
पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवली. त्याच्या नावावरून शहराला अहमदनगर नाव देण्यात आले.

हेही वाचा - मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदीदारांना फायदा - महसूलमंत्री

हेही वाचा - विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी शिक्षकचं विकतोय अवैध दारू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.