शिर्डी - राहुरी ( Rahuri ) शहरातील अनेक शाळांपैकी एक असलेल्या भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेत नगरपरीषदेच्या ( Nagar Parishad ) संयुक्त जलपूर्ती योजना या उपक्रमाअंतर्गत जीवनधारा वॉटर एटीएमची गाडी थेट शाळेत आली. त्यात पैसे टाकून मुले शुध्द पाण्यासाठी रांगा लावल्याचा एक फोटो समोर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेनेच शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तशी व्यवस्थाही शाळेत केलेली असावी, ही माफक अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांची असते. एखाद्या शाळेत फिल्टर अर्थात आर ओ नसेल तर तेही अनेक दानशूर व्यक्ती देण्यास तयार असतात. मात्र, याच्या विपरित चित्र राहुरीच्या भागीरथीबाई तनपुरे मुलीच्या शाळेत ( Bhagirathibai Tanpure Girls School ) दिसून येत आहे.
नगरपरिषदेच्या गाडीतून पैसे देऊन पाणी - सध्या अनेक शहरात नगरपालिकांनी नळाद्वारे शुध्द पाणी पुरवठा करण्याची गरज असताना तुम्हाला जर फिल्टर पाणी हवे असेल तर पैसे मोजावे लागत असताना प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. पैसे देऊन मुलांना पाणी घ्यावे लागत आहे. तशा गाड्याही शहरभर फिरत आहेत. अशातच राहुरी नगर परीषदेच्या आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा फोटो असलेल्या गाडीतून पैसे देवून मुलांना पाणी घ्यावी लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
खाऊचे पैसे पाण्यात - मुलांना घरच्यांनी खाऊ खाण्यासाठी दिलेल्या पैशातून काही पैसे काढून त्यातून पाणी विकत घ्यावे लागत आहे. शाळेत गाडी आल्यावर पैसे देऊन मुले पाणी घेतानाचा फोटो समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाकडे या बाबत चौकशी केली असता सुरवातीला गाडी शाळेत आलीच नाही, असे सांगण्यात आले. मग तो फोटो कुठला विचारले असता गाडी आमच्या शाळेतच आली होती. मुलांना शुध्द पाणी मिळावे ही चांगली बाब आहे. मात्र, ती गाडी प्रायोगिक तत्वावर शाळेत बोलविण्यात येऊन शाळेच्याच पैशाने पाणी दिली गेले असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे. शाळेत आठ हजार लिटरची पाण्याची टाकी आहे. मग त्या टाकीतून शुध्द पाणी पुरवठा होत नाही का, तसेच शाळेला विकतचे पाणी देण्याची खरच गरज होती का, असे प्रश्नही उपस्थित होते आहेत.
हेही वाचा - Legislative Council Elections: विधान परिषद निवडणूक घडामोडी वाढल्या काँग्रेस आमदारांची बैठक