शिर्डी (अहमदनगर) - पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी कोरोनानंतर पुन्हा खुले करण्यात आले आहे. आज (सोमवारी) पहाटे साडेचारच्या काकड आरतीला 60 भाविकांना सोडण्यात आले होते. मंदिर उघडणार असल्याने पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. मात्र याठिकाणी दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण फज्जा उडाला आहे. स्व:त कार्यकारी अधिकाऱ्यांनीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले नसल्याने आणि भक्तांची दिशाभुल केल्याची तक्रार मुखमंत्र्याकडे करणार असल्याचे शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि ग्रामस्थांनी सांगितले आहे.
पहिल्याच दिवशी व्यवस्थेचा फज्जा
आजपासून दर्शन सुरु करणार असल्याने साई संस्थानने तयारी केली होती. त्यात प्रामुख्याने भक्तांना ऑनलाईन पध्दतीनेच बुकींग करुन यावे लागेल तसेच ग्रामस्थांना आणि थेट शिर्डीत आलेल्या भक्तांना टोकन घेऊन च दर्शनासाठी सोडणार असल्याचे साई संस्थानने जाहीर केले होते. मात्र दर्शनासाठी कालपासूनच बुकींग करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाविकांना वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे दर्शन घेता आले नाही.
हेही वाचा - दिवाळी पाडव्याला होणार विठूरायाचे मुखदर्शन; दररोज एक हजार भाविकांना लाभ
मंदिरात कोणत्याही सॅनिटायझेशनची व्यवस्था नाही, कार्यकारी अधिकाऱ्यांनीच नियमांचे पालन केले नाही, असा आरोप शिवसेनेचे खासदार तसेच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हजार भाविकांचा आकडा पार झाला होता. दर्शन रांगेत दोन भाविकांमधील अंतर ठेवले जात नव्हते, देशातील दोन नंबरचे देवस्थान असलेल्या शिर्डी संस्थानच्या नियोजनात पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा - ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आज भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ