अहमदनगर- शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्त अनेक स्वरुपातील वस्तू दान स्वरुपात चढवतात. सोने चांदीच्या वस्तुही मोठ्या प्रमाणात असतात. आजही बंगलोर आणि दावणगिरी येथील साईभक्तांनी साई चरणी तब्बल 25 लाख रुपयांचे अलंकार अर्पण केले आहेत.
बंगलोर आणि दावणगिरी येथील पारायण मंडळाच्या सदस्यांनी आज शिर्डीत येऊन साईचरणी दोन चांदीच्या बादल्या, एक सुवर्ण हार आणि दोन सोन्यात गुंफलेल्या रुद्राक्षाच्या माळा दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या वस्तुंची किंमत 25 लाख रुपये आहे. साई मूर्तीला दररोज पहाटे मंगलस्नान घातले जाते. यावेळी या दान स्वरुपात मिळालेल्या चांदीच्या बादल्या वापरण्यात येणार आहेत. याच बरोबरीने साईच्या मूर्तीला आणि सामाधीला रुद्राक्ष माळ घालण्यात येणार आहे.